एक्स्प्लोर
लालबागचा राजा अथांग समुद्रात विसावला!
लालबागच्या राजाच्या विसर्जनासह मुंबईतील गणपतीचं विसर्जन संपन्न झालं आहे.

मुंबई : पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आश्वासन देऊन लालबागच्या राजाने भाविकांचा निरोप घेतला. तब्बल 22 तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर लालबागचा राजा अथांग अरबी समुद्रात विसावला. सकाळी आठच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं विसर्जन झालं. मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला लालबागचा राजा 20 तासांनी म्हणजे आज सकाळी गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. तराफ्यावर बसवल्यानंतर राजाची आरती करण्यात आली. त्यानंतर कोळी बांधवांनी राजाला सलानी दिली आणि मग तो विसर्जनासाठी रवाना झाला. लाडक्या बाप्पाचं रुप डोळ्यात साठवण्यासाठी आणि 12 दिवस मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर त्याला निरोप देण्यासाठी हजारो भाविक चौपाटीवर जमले होते. लालबागच्या राजाच्या विसर्जनासह मुंबईतील गणपतीचं विसर्जन संपन्न झालं आहे. दुसरीकडे, गणेश गल्लीचा राजा अर्थात मुंबईच्या राजाचं मंगळवारी रात्री 8.30 च्या सुमारास विसर्जन झालं. दरम्यान, आज सकाळी सात वाजेपर्यंत तब्बल 40,419 गणपती आणि गौरींचं मूर्तींचं विसर्जन झालं. यामध्ये सार्वजनिक 6943, घरगुती 33,288, गौरी 188 मूर्तींचा समावेश आहे. त्यापैकी कृत्रिम तलावात 164 सार्वजनिक, 2748 घरगुती आणि 5 गौरींच विसर्जन करण्यात आलं. संबंधित बातम्या LIVE : गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं विसर्जन गणपती विसर्जनाला गालबोट, राज्यभरात 15 जण बुडाले LIVE : राज्यभरातील गणपती विसर्जन मिरवणूक
आणखी वाचा























