एक्स्प्लोर
मुंबईत रांगेच्या वादातून प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
मुंबई : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस शनिवारी रात्री लढाईचं मैदानच बनलं होतं. कुर्ल्याच्या एलटीटीवर रांगेच्या वादातून प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडीओ समोर आला आहे.
या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी सहा प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मारामारी करणारे हे सर्व प्रवासी गोदान एक्स्प्रेसने जाणार होते. यासाठी सगळे जण रांगेत उभे होते. यानंतर दोन गटातील प्रवाशांमध्ये रांग लावण्यावरुन सुरुवातील बाचाबाची झाली. मात्र यानंतर वाद अधिक वाढला आणि बघता बघता प्लॅटफॉर्म जणू लढाईचं मैदान बनलं.
मारामारी सुरु असताना रेल्वे पोलिस तिथे उपस्थित नव्हते. मात्र यावेळी प्लॅटफॉर्मवरील एका प्रवाशाने या हाणामारीचा व्हिडीओ मोबाईलवर चित्रीत केला आणि त्यानंतर पोलिसांना सोपवला. त्यानंतर कारवाई करत पोलिसांना सहा जणांना अटक केली.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement