Mumbai Fake Vaccination : मुंबईतील बोगस लसीकरण प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. मनिष त्रिपाठींचं आत्मसमर्पण
काही दिवसांपूर्वी मुंबईतील बोगस लसीकरण प्रकरण उघडकीस आलं होतं. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. मनिष त्रिपाठींनी आत्मसमर्पण केलं आहे. अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं.
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईतील बोगस लसीकरण प्रकरण समोर आलं होतं. याप्रकरणी मुंबई महापालिकेनंही बोगस लसीकरण झाल्याचं मान्य केलं होतं. याप्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. मनिष त्रिपाठी यांनी पोलिसांमध्ये आत्मसमर्पण केलं आहे. अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यानंतर त्रिपाठी यांनी पोलिसांमध्ये आत्मसमर्पण केलं आहे. मुंबईत उघडकीस आलेल्या बोगस लसीकरण प्रकरणातील लसी डॉ. मनिष त्रिपाठी यांनी पुरवल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यानंतर त्यांनी पोलिसांत आत्मसमर्पण केलं आहे.
दरम्यान, कोरोनापासून बचाव करण्यासाठी सध्या लसीकरण हाच एक पर्याय आहे. मात्र याचासुद्धा फायदा घेऊन लोकांची फसवणूक मोठ्या प्रमाणात मुंबईत केली जात होती. शहरात विविध ठिकाणी बोगस लसीकरण शिबिर आयोजित करून फसवणूक करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. या प्रकरणी मुंबईच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये सात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर या प्रकरणी आता मुंबई पोलिसांकडून एसआयटी सुद्धा नेमण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे पूर्ण विश्व त्रस्त आहे अजूनही यावर उपचार सापडला नाही. मात्र लसीकरण केल्यामुळे या जीवघेण्या आजाराला लांब ठेवण्यास मोठी मदत होत आहे. मात्र आता काही लसीकरण याच्या नावावर सुद्धा पैसे कमवून लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. अशाच एका टोळीला जी मुंबईमध्ये लसीकरणाच्या नावावर लोकांची फसवणूक करत होती त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी मुंबईमध्ये सात गुन्हे दाखल असून एकूण दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशातच आता या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या डॉ. मनिष त्रिपाठी यांनी आत्मसमर्पण केलं आहे.
मुंबईत दोन हजार 53 जणांचं बोगस लसीकरण झाल्याची पालिकेकडून कबुली
बनावट लसीकरणाच्या माध्यमातून एकूण दोन हजार 53 नागरिकांना फसवण्यात आल्याची माहिती पालिकेनं हायकोर्टासमोर मांडली होती. एकाच टोळीनं कांदिवली, बोरिवली, वर्सोवा, खार अशा पश्चिम उपनगरांतील वेगवेगळ्या ठिकाणी ही बनावट लसीकरणाची खाजगी शिबिरं घेण्यात आली होती. बोगस लसीकरण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा, आरोपींवर कठोर करवाई करा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मुंबई पोलिसांनी पश्चिम उपनगरांत विविध कलमांखाली या रॅकेटविरोधात गुन्हे दाखल केले होते. काही आरोपींच्यावतीनं दाखल अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते, तर काहींचे अद्याप प्रलंबित होते. मात्र कुणालाही अटकपूर्व जामीन अर्ज अद्याप दिलेला नाही, तसेच फरार आरोपींचा शोध सुरु होता. या गुन्ह्याची एकच पद्धत असून या रॅकेटनं नऊ वेगवेगळ्या ठिकाणी लसीकरणाची शिबिरं घेतल्याचं समोर आलं आहे. त्याप्रमाणे मुंबई महापालिकेनं 23 जून रोजी मुंबई पोलिसांत चार एफआयआर नोंदवले होते. लसीकरणाचे एक शिबिर बोरिवलीत ज्या आदित्य कॉलेजमध्ये झाले त्या कॉलेजचे आशिष मिश्रा यांना बोरिवलीच्या एफआयआरमध्ये आरोपी केलंय, तर डॉ. मनीष त्रिपाठी हे आरोपी फरार होते. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत चारशे साक्षीदारांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :