एक्स्प्लोर

Mumbai Drug Case : क्रूझ ड्रग्स प्रकरणी अनन्या पांडेला पुन्हा एनसीबीचं समन्स; आज चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश

Mumbai Cruise Drug Case : क्रूझ ड्रग्स प्रकरणी अनन्या पांडे (Ananya Pandey) ला पुन्हा एनसीबीनं समन्स बजावले आहे. आज सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश एनसीबीनं अनन्याला दिले आहेत.

Mumbai Cruise Drug Case : अभिनेत्री अनन्या पांडेला आज पुन्हा एनसीबीने चौकशीसाठी बोलवलं आहे. सकाळी 11 वाजता तिला एनसीबीसमोर हजर राहावं लागणार आहे. शुक्रवारी तिची साडेतीन तास चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी अनन्या पांडेला (Ananya Pandey) ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानसोबत झालेल्या चॅटच्या आधारावर बोलावले होते. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चॅटमध्ये असा आरोप केला जात आहे की अनन्या गांजाबद्दल बोलत होती. आर्यन त्या चॅटमध्ये गांजाची व्यवस्था करण्याबद्दल बोलत होता असाही आरोप आहे. मात्र, पहिल्याच दिवशी चौकशीदरम्यान अनन्याने आरोप नाकारले होते. दरम्यान, एनसीबी (NCB) सध्या मुंबईतीस क्रूझ ड्रग्स प्रकरणाचा कसून तपास करत आहे. या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या अटकेत आहे. 

अनन्याची चौकशी का केली जात आहे?

अनन्या पांडेची गुरुवारी सुमारे 2 तास चौकशी करण्यात आली. अनन्या पांडेला ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानसोबत झालेल्या चॅटच्या आधारावर बोलावले होते. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चॅटमध्ये असा आरोप केला जात आहे की अनन्या गांजाबद्दल बोलत होती. आर्यन त्या चॅटमध्ये गांजाची व्यवस्था करण्याबद्दल बोलत होता असाही आरोप आहे. मात्र, पहिल्याच दिवशी चौकशीदरम्यान अनन्याने आरोप नाकारले होते.

चौकशीच्या पहिल्या दिवशी काय झालं?

गुरुवारी, जेव्हा अनन्या पांडे तिचे वडील चंकी पांडे यांच्यासह NCB च्या झोनल हेड क्वार्टरमध्ये दुपारी 4 च्या सुमारास पोहोचली, तेव्हा चंकी पांडेला चौकशीतून बाहेर बसवले गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास अधिकारी व्ही.व्ही.सिंग, झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि एका महिला अधिकाऱ्याने अनन्या पांडेची चौकशी केली.

एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, अनन्या पांडेने सांगितले की, ती धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आर्यन खानसोबत शिकली आहे आणि ती आर्यन खानची बहीण सुहानाची जवळची मैत्रीण आहे. यामुळे आर्यन, सुहाना आणि अनन्या हे एकमेकांचे कौटुंबिक मित्र आहेत. शूटिंग शेड्यूल व्यतिरिक्त, जेव्हा ती घरी राहते, तेव्हा ते सर्वजण एकत्र येतात, ज्यामध्ये शाळेतील मित्रांचा एक सर्कल देखील आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान अनन्याने NCB ला व्हिडीओ चॅटबद्दल सांगितले की, हे चॅट त्यावेळी सिगारेट आणण्याच्या संदर्भात होती, बराच वेळ निघून गेला आहे, यामुळे तिला नक्की कोणत्या संदर्भात ही गोष्ट आठवत नाही आणि वीड हे एक ड्रग्ज आहे याची त्यांना जाणीव नव्हती.

समीर वानखेडेंनी अनन्या पांडेला फटकारलं

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) हिला चांगलंच फटकारलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  चौकशीसाठी उशिरा दाखल झाल्यानं समीर वानखेडे चांगलेच संतापले होते. चौकशीसाठी 11 वाजताची वेळ दिली असताना अनन्या दुपारी 2 वाजता पोहोचली, त्यामुळं समीर वानखेडे यांनी तिला खडेबोल सुनावले.

काल एनसीबीनं सलग दुसऱ्या दिवशी अनन्याला चौकशीसाठी बोलावलं होतं.  एनसीबीनं अनन्याला सकाळी 11 वाजताची वेळ दिली होती. मात्र ती तीन तास उशीरा म्हणजे 2 वाजता एनसीबी कार्यालयात पोहोचली.  त्याआधी देखील अनन्याला एनसीबीनं 2 वाजताची वेळ दिली होती मात्र  अनन्या 4 वाजता पोहोचली होती. यामुळं एनसीबी त्या दिवशी व्यवस्थित चौकशी करु शकली नाही. 

सलग दुसऱ्या दिवशी ती उशीरा आल्यानं समीर वानखेडे यांनी तिला फटकारलं.  समीर वानखेडे यांनी म्हटलं की, तुम्हाला 11 वाजता बोलावलं आणि आपण आता आलात. अधिकारी तुमची वाट पाहात बसलेले नाहीत. हे तुमचं प्रोडक्शन हाऊस नाही. हे  सेंट्रल एजेंसीचं ऑफीस आहे. ज्यावेळेवर बोलावलं आहे, त्याच वेळेवर पोहोचा, अशी तंबीही त्यांनी अनन्याला दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget