एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फेरीवाल्यांवरील कारवाईबाबत राज ठाकरेंची डेडलाईन संपली
15 दिवसात रेल्वे स्थानकं फेरीवालेमुक्त न झाल्यास 16 व्या दिवशी आपल्या स्टाइलनं पादचारी पूल आणि रस्ता फेरीवालामुक्त करु, असं राज ठाकरेंनी रेल्वे प्रशासनाला ठणकावलं होतं.
मुंबई : एल्फिन्स्टन स्थानकावरील चेंगराचेंगरीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रेल्वे प्रशासनाला दिलेली डेडलाईन आज संपली आहे. त्यामुळे राज ठाकरे यापुढे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
मुंबईतील एलफिन्स्टन रोड स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मनसेने ‘संताप मोर्चा’चं आयोजन केलं होतं. मुंबईतील मेट्रो सिनेमा ते चर्चगेट असा भव्य मोर्चा काढून राज ठाकरे यांनी चर्चगेटमधल्या रेल्वे कार्यालया आपलं निवेदन रेल्वे प्रशासनाला दिलं.
परवानगीविना मनसेचा मोर्चा, आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल
15 दिवसात पादचारी पूल आणि स्टेशनबाहेरील रस्ते फेरीवालेमुक्त करण्याचं अल्टिमेटम त्यांनी दिलं होतं. 15 दिवसात तसं न झाल्यास 16 व्या दिवशी आपल्या स्टाइलनं पादचारी पूल आणि रस्ता फेरीवालामुक्त करु, असंही राज ठाकरेंनी रेल्वे प्रशासनाला ठणकावलं होतं. भाषणात राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनासह भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. आता राज ठाकरेंच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल, याकडे सर्व मुंबईकरांचं लक्ष असेल.संबंधित बातम्या :
15 दिवसात फेरीवाले हटवा, अन्यथा 16 व्या दिवशी आम्ही हटवू : राज ठाकरे
मनसे संताप मोर्चा : राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
ठाणे
जॅाब माझा
जळगाव
Advertisement