Mumbai Corona Update : मुंबईत बुधवारी 1504 रुग्णांची नोंद, 1645 कोरोनामुक्त
Mumbai Corona Update : बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी मुंबईत 1504 नव्या रुग्णांची भर पडली आहे.
Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. आज मुंबईत 1504 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत बुधवारी 1645 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 79 हजार 774 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 609 झाली आहे. सध्या मुंबईत 11,844 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 1504 रुग्णांमध्ये 1444 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 461 दिवसांवर गेला आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 29, 2022
29th June, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 1504
Discharged Pts. (24 hrs) - 1645
Total Recovered Pts. - 10,79,774
Overall Recovery Rate - 97%
Total Active Pts. - 11844
Doubling Rate - 461 Days
Growth Rate (22nd June- 28th June)- 0.143%#NaToCorona
सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 11844 सक्रिय रुग्ण आहेत. तर ठाण्यात 5655 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर पुण्यात 3812 सक्रिय रुग्ण आहेत. पालघर 751, रायगड 1382, रत्नागिरी 90, सिंधुदुर्ग 68, सातारा 75, सांगली 74, कोल्हापूर 53, सोलापूर 94, नाशिक 248, अहमदनगर 108, जळगाव 74, धुळे 18, औरंगाबाद 123, जालना 30, लातूर 100, हिंगोली 11, नांदेड 39, उस्मानाबाद 62, अमरावती 27, अकोला 44, वाशिम 156, बुलढाणा 80, यवतमाळ 55, नागपूर 466, वर्धा 26, भंडारा 41, गोंदिया 16, गडचिरोली 31 आणि चंद्रपूरमध्ये 56 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 25735 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात आज 3957 कोरोनाच्या (Corona) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 3696 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत सध्या 11844 सक्रिय रुग्ण आहेत.
संबंधित बातम्या