Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी 3957 नव्या रुग्णांची नोंद तर 3696 रुग्ण कोरोनामुक्त
Maharashtra Corona Update : राज्यात आज सात कोरोनाबाधित रुग्णाने आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला आहे.
मुंबई : राज्यात आज 3957 कोरोनाच्या (Corona) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 3696 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत सध्या 11844 सक्रिय रुग्ण आहेत.
सात कोरोनाबाधितांचा मृत्यू
राज्यात आज सात कोरोनाबाधित रुग्णाने आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 77,98,817 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.82 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात आज एकूण 25,735 सक्रिय रुग्ण
राज्यात आज एकूण 25,735 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 11,844 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 5655 सक्रिय रुग्ण आहेत.
देशात 14 हजार 506 नवीन कोरोनाबाधित, 30 रुग्णांचा मृत्यू
हळूहळू देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळं नागरिकांच्या चिंतेत वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात 14 हजार 506 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात कोरोनामुळं देशात 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. दरम्यान, कालच्यापेक्षा आज कोरोना रुग्णांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. मंगळवारी देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. मात्र, आज पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.
मंगळवारी देशात कोरोनाचे 11 हजार 793 नवीन रुग्ण आढळले होते. त्यापूर्वी सोमवारी देशात 17 हजार 73 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 99 हजार 602 वर गेली आहे.
संबंधित बातम्या