एक्स्प्लोर
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन संजय निरुपम यांची उचलबांगडी?
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी संजय निरुपम यांच्या जागी कृपाशंकर सिंग किंवा भाई जगताप यांची निवड होण्याची चर्चा आहे.

मुंबई : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन संजय निरुपम यांची लवकरच उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. 'एबीपी माझा'च्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी संजय निरुपम यांच्या जागी कृपाशंकर सिंग किंवा भाई जगताप यांची निवड होण्याची चर्चा आहे. बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपातून बाहेर आल्यानंतर कृपाशंकर सिंग यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र मुंबईत मराठी अध्यक्ष देण्यासाठी काँग्रेसमधील एक गट आग्रही असल्याचं म्हटलं जातं. काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रभारीपदी मल्लिकार्जुन खर्गे यांची नियुक्ती झाल्यानंतर संघटनात्मक बदलाचे वारे वाहू लागले आहेत. याच अंतर्गत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निरुपम यांना दूर करण्यात येणार असल्याचं बोललं जातं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग























