एक्स्प्लोर
'विकी डोनर'ना लुटणारे मुंबईतले 'बंटी आणि बबली'
मुंबई : अभिनेता आयुषमान खुरानाची मुख्य भूमिका असलेला 'विकी डोनर' हा सिनेमा चांगलाच गाजला होता. एक बेरोजगार तरुण वीर्याची विक्री करुन लाखो रुपयांची कमाई करतो, अशा कथेवरील या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र या चित्रपटावरुन कल्पना उचलत दोघांनी अनेक तरुणांना गंडा घातल्याचं समोर आलं आहे.
तरबेज उर्फ सलीम खान आणि रेणुका जाधव यांनी वीर्याची विक्री करण्याच्या आमिषाने 30 हून अधिक तरुणांना गंडा घातल्याची माहिती आहे. 'मिड डे' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिलेली आहे. समाजमान्यता नसल्यामुळे अनेक जण वीर्यदान केल्यानंतर नावाबाबत गुप्तता बाळगणं पसंत करतात. याचाच फायदा उचलून दोघांनी 'टार्गेट' हेरले.
कशी होती कार्यपद्धत?
अल्पावधीत जास्तीत जास्त पैसे कमवण्याची इच्छा असणारे, बेरोजगार तरुण दोघं रेकी करुन हेरायचे. त्यानंतर प्रोफेशनल पेहराव करुन आपला प्रस्ताव या तरुणांपुढे सादर करायचे. मोठ्या मोबदल्याच्या आमिषाने त्यांचं मन वळवलं जायचं. एकदा तरुण राजी झाला की लॅब टेस्टिंगच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे उकळले जायचे. काही दिवसांनी, आणखी काही तरुण जमवून एकत्रित लॅब टेस्टिंग केलं जाईल, अशी बतावणी ते करत.
एकदा त्यांचं वीर्य लॅब टेस्टमध्ये पास झालं, की दरमहा 4.70 लाख रुपये मिळतील, असं आमिष दाखवलं जात असे. मात्र लॅब टेस्टिंगसाठी दोन लाखांचा खर्च येईल, असं सांगत आरोपी तरुणांकडून पैसे उकळत. पैसे लुटून दोघं परागंदा व्हायचे, आणि लज्जेखातर फसवले गेलेले तरुण कुटुंबीय किंवा पोलिसांना सांगायला का-कू करत. दरम्यान दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement