बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 394 मीटर लांबीचा एडीआयटीचा बोगदा पूर्ण!
बोगदा आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व वास्तूंचे सुरक्षित उत्खनन व्हावे, यासाठी अनेक मॉनिटरिंग उपकरणांचा वापर केला जात आहे.
![बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 394 मीटर लांबीचा एडीआयटीचा बोगदा पूर्ण! mumbai bullet train project adit tunnel completed bkc shilphata bullet train work will get easy बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 394 मीटर लांबीचा एडीआयटीचा बोगदा पूर्ण!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/fad6fd3b627f977b69d878e267893bce1716804762058988_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोली येथे 394 मीटर लांबीच्या इंटरमीडिएट बोगद्याचे (एडीआयटी) खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्रातील बीकेसी ते शिळफाटा दरम्यान 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या बांधकामाला गती मिळणार आहे.
16 किमी टनेल बोरिंग मशिनद्वारे
26 मीटर खोल झुकलेल्या एडीआयटीमुळे न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (एनएटीएम) द्वारे 3.3 किमी (अंदाजे) बोगद्याचे बांधकाम सुलभ होईल. ज्यामुळे दोन्ही बाजूंनी 1.6 मीटर (अंदाजे) बोगद्यासाठी एकाच वेळी प्रवेश मिळेल. बोगद्याच्या 21 किमी बांधकामापैकी 16 किमी टनेल बोरिंग मशिनद्वारे तर उर्वरित 5 किमी एनएटीएमद्वारे आहे.
सहा महिन्यांच्या अल्पावधीत खोदकाम
एडीआयटीसाठी 6 डिसेंबर 2023 रोजी खोदकाम सुरू करण्यात आले असून 394 मीटर लांबीची संपूर्ण लांबी सहा महिन्यांच्या अल्पावधीत खोदण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली 27 हजार 515 किलो स्फोटकांचा वापर करून एकूण 214 नियंत्रित स्फोट करण्यात आले आणि सुरक्षित उत्खननासाठी उच्च दर्जाच्या उपकरणांचा वापर करण्यात आला.
अनेक मॉनिटरिंग उपकरणांचा वापर
बोगदा आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व वास्तूंचे सुरक्षित उत्खनन व्हावे, यासाठी अनेक मॉनिटरिंग उपकरणांचा वापर केला जात आहे. या कामासाठी एसएसपी (सरफेस सेटलमेंट पॉइंट), ओडीएस (ऑप्टिकल डिस्प्लेसमेंट सेन्सर) किंवा दोन्ही अक्षातील विस्थापनासाठी टिल्ट मीटर, बीआरटी (टार्गेट/थ्रीडी टार्गेटप्रतिबिंबित करून), बोगद्याच्या पृष्ठभागावरील सूक्ष्म ताणांसाठी स्ट्रेन गेज, पीक पार्टिकल व्हेलोसिटीसाठी सिस्मोग्राफ (पीपीव्ही) किंवा व्हायब्रेशन अँड सिस्मिक वेव्ह मॉनिटर ही उपकरणे वापरली जात आहेत.
बोगद्याचे काम वेगाने सुरू
महाराष्ट्र राज्यातील मुंबई बुलेट ट्रेन स्थानक ते शिळफाटा या 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम वेगाने सुरू आहे. या बोगद्याचा 7 किमीचा (अंदाजे) भाग ठाणे खाडी (इंटरटाइडल झोन) येथे समुद्राखाली असेल. देशात अशा प्रकारचा हा पहिलाच बोगदा उभारण्यात आला आहे.
6-8 मीटर व्यासाचे कटर हेडचा वापर
21 किमी लांबीचा हा बोगदा अप आणि डाऊन ट्रॅकसाठी असलेल्या दोन ट्रॅकला सामावून घेणारा सिंगल ट्यूब बोगदा असेल. हा बोगदा तयार करण्यासाठी 13.6 मीटर व्यासाच्या कटर हेड असलेल्या टनेल बोरिंग मशिनचा (टीबीएम) वापर करण्यात येणार आहे. सामान्यत: एमआरटीएस - मेट्रो प्रणालीमध्ये वापरल्या जाणाऱ्या शहरी बोगद्यांसाठी 6-8 मीटर व्यासाचे कटर हेड वापरले जातात, कारण हे बोगदे केवळ एका ट्रॅकला सामावून घेतात. बीकेसी, विक्रोळी आणि सावली येथे निर्माणाधीन तीन शाफ्टमुळे टीबीएमच्या माध्यमातून 16 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करणे शक्य होणार आहे.
हेही वाचा :
शरद कोळी, माजी आमदार रमेश कदमांसह 72 जणांना 1 महिन्याची शिक्षा!
नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांत खदखद; मिसळ पार्टीतील नाराजीचा ठसका शिवतीर्थापर्यंत जाणार का?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)