एक्स्प्लोर

मुंबईतील भेंडीबाजार इमारत दुर्घटना : 24 तासांचे अपडेट्स

भेंडीबाजारमध्ये गुरुवारी कोसळलेल्या इमारतीतील मृतांचा आकडा वाढताच आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत

मुंबई : मुंबईतील भेंडीबाजार परिसरातील हुसैनी इमारत कोसळून 34 जणांचा मृत्यू झाला आहे. 13 जखमींवर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये 23 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. यामध्ये 20 दिवसांचा मुलगा, तीन वर्षांच्या दोन मुली आणि सहा वर्षांच्या एका मुलाचा समावेश आहे. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. ढिगाऱ्याखालून 44 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. यापैकी 13 जखमींवर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 11 पुरुष, तर दोन महिलांचा समावेश आहे. गुरुवारी सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास हुसैनी इमारत पडली होती. मुंबईतील भेंडीबाजार भागात पाकमोडिया स्ट्रीटवर ही 125 वर्ष जुनी सहामजली इमारत होती. मूळ तीनमजली असलेल्या इमारतीवर तीन मजले नंतर बांधण्यात आले होते. या बिल्डिंगचं नाव आधी आरसीवाला होतं. ही इमारत धोकादायक घोषित केल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

मुंबईतील भेंडीबाजारमध्ये इमारत कोसळली

या इमारतीत तळमजल्यावर असलेल्या गाळ्यांमध्ये आजूबाजूच्या हॉटेलात काम करणारे लोक राहत होते. काही ठिकाणी जेवण बनवण्याचं काम सुरु होतं. इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर 5 कुटुंबं वास्तव्यास होती. 12 खोल्या आणि 20 गोदामं इमारतीत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे याच इमारतीत एक प्ले स्कूलही चालवण्यात येत होतं. ही शाळा 10 वाजता सुरु होत असल्याने अनेक चिमुकल्यांचे जीव वाचले आहेत.

LIVE : भेंडीबाजार इमारत दुर्घटना

अझीज खान यांचे भाऊ ईक्बाल खान ढिगाऱ्याखाली अडकल्याचं म्हटलं जात आहे. इमारतीच्या बेसमेंटमधील तबक्कल मिठाई दुकानात पदार्थ बनवण्यासाठी ते येत असत. त्यांच्या व्यतिरिक्त आणखी 4 जण कामगार या मिठाई दुकानात होते. त्यापैकी एकाला वाचवण्यात आलं आहे. तर तिघांचा शोध अजूनही सुरु आहे. इकबालच्या घरी तीन मुलं, 7 वर्षांची मुलगी आणी  बायको आहे. इमारत दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार असून म्हाडाच्या उपमुख्य अभियंत्याच्या अध्यक्षतेखाली समिती गठन करण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

PHOTO : मुंबईतील भेंडीबाजारमध्ये इमारत कोसळली

हुसैनी इमारत धोकादायक होती. 2011 सालीच इमारत रिकामी करण्याचे आदेश म्हाडानं दिले होते. त्यानंतरही इमारतीत कुटुंबं राहत होती. त्यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच महापालिकेचे कर्मचारी, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या दोन तुकड्या बचावकार्यासाठी दाखल झाले होते. बचावकार्य सुरु असताना अग्निशमन दलााचा एक, तर एनडीआरएफच्या पथकातील 6 जवान जखमी झाले. इमारत कोसळल्यानंतर आजूबाजूच्या तीन इमारतींना तडे गेले होते. त्यामुळे या इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढण्यात आलं.

भेंडीबाजार दुर्घटना : आमचं घरही व्हायब्रेट झालं, दाऊदच्या भावाची मुलाखत जशीच्या तशी

‘सेस’प्राप्त इमारत हुसैनीवाला इमारत ही उपकरप्राप्त (सेस) इमारत होती. म्हाडा’च्या अंतर्गत ही इमारत येत होती. 2013 साली इमारतीला नोटीसही बजावण्यात आली होती. त्यानंतर काही रहिवासी इथून निघून गेले, तर काही जण मात्र इथेच राहत होते. ‘या भागातील अनेक इमारती खूप जुन्या म्हणजे कमीत कमी 50 वर्षांपूर्वीच्या आहेत. मुंबईत झालेल्या जोरदार पावसाच्या तडाख्यानं आधीच जुन्या-जर्जर झा इमारतींना धोका निर्माण झाला आहे. 50 ते 100 वर्षांपूर्वीच्या ज्या इमारतींमध्ये मालकांनी पागडी सिस्टीमवर किंवा डिपॉझीट सिस्टीमवर भाडेकरु ठेवले, ते वर्षानुवर्ष तिथे राहत आहेत. या इमारतींची दुरुस्ती करणं मालकांना परवडत नव्हतं. 1976 साली महाराष्ट्र शासनानं नवा कायदा केला आणि विशेष करांअंतर्गत या इमारती दुरुस्त कराव्यात असं म्हटलं. अशा इमारतींना सेस, म्हणजे उपकर लागू होतो. ही इमारत धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये होती. सेस इमारतींची देखभाल करणं, दुरुस्ती करणं ही जबाबदारी म्हाडाची आहे.

हुसैनी इमारत दुर्घटनेचे 12 फोटो

कोसळलेली इमारत नेमकी कशी होती? इमारतीचं नोंदणीकृत नाव – हुसैनी इमारत मूळ इमारत 3 मजली, त्यावर 3 मजले नंतर बांधले तळमजल्यावर – अनिवासी गाळा/ गोडाऊन 1. पहिल्या मजल्यावर 4 खोल्या 2. दुसऱ्या मजल्यावर 1 खोली 3. तिसऱ्या मजल्यावर 1 खोली 4. चौथ्या मजल्यावर 1 खोली 5. पाचव्या मजल्यावर 1 खोली 6. सहाव्या मजल्यावर 1 खोली गेल्या महिन्याभरातील मुंबईत इमारत कोसळण्याची ही तिसरी दुर्घटना आहे. 26 जुलै 2017 रोजी घाटकोपरमध्ये साईदर्शन ही इमारत पडली होती. तर गेल्या आठवड्यात चांदिवलीत इमारत कोसळली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 60 Superfast News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 31 March 2025 : ABP MajhaDisha Salian Case : दिशा सालियन प्रकरण 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी वकील ओझांना पेनड्राईव्ह दिलाMahadev Gitte :कराडच्या लोकांनी महादेव गित्तेसह इतरांना मारहाण केली, गित्तेच्या पत्नीनं फेटाळला आरोपJob Majha | भारतीय रेल्वे मध्ये भरती | नोकरीची संधी | 31 March 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
Dattatray Bharne : पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
Kunal Kamra : 10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget