एक्स्प्लोर

Firecracker: प्रदूषणामुळे सर्दी-खोकल्याच्या रुग्णात होत आहे वाढ, फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे मुंबई-पुण्यातील हवा गुणवत्तेवर परिणाम

Firecracker: दिवाळी म्हंटलं की दिव्यांची रोषणाई आणि आतिषबाजीचा सण… मात्र, ह्याच आतिशबाजीमुळे मुंबईची दिल्ली होतेय का? असा प्रश्न निर्माण झालाय.

Firecracker: दिवाळी म्हंटलं की दिव्यांची रोषणाई आणि आतिषबाजीचा सण… मात्र, ह्याच आतिशबाजीमुळे मुंबईची दिल्ली होतेय का? असा प्रश्न निर्माण झालाय. या दिवाळीत सव्वा कोटींहून अधिकचे फटके फोडण्यात आलेत. अशात फटाक्यांच्या आतिषबाजीचा परिणाम मुंबई आणि पुण्यातील हवा गुणवत्तेवर झालाय. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक प्रमाणात प्रदूषणात भर पडल्याची नोंद ‘सफर’ या संस्थेने नोंदवली आहे. 

मागच्या वर्षी दिवाळीत पाऊस होताना बघायला मिळाला. त्यामुळे प्रदूषणात अधिक भर पडली नाही. मात्र, ह्या वर्षी नवी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक वाईट स्थितीत गेला असून 300 च्या जवळ पोहोचलाय. सोबतच मुंबईतील बीकेसी, मलाड आणि माझगावमधील हवा गुणवत्ता स्तर देखील वाईट स्थितीत आहे. पुण्यातील कोथरुड आणि भोसरीतही तशीच काहीशी परिस्थिती होती.

लक्ष्मीपूजनादिवशी आणि त्यानंतर काही वेळ काय होती परिस्थिती?

मुंबईतील सरासरी एक्यूआय 145 वर होता. त्यात पीएम 2.5 प्रदुषकाची मात्रा अधिक होती. नवी मुंबईतील एक्यूआय तर थेट 300 पार बघायला मिळाला. पुण्यातही काही वेगळी परिस्थिती नव्हती भोसरीत एक्यूआय 316, कोथरुडमध्ये 302, शिवाजीनगर 228 पर्यंत गेला होता. हवेतील धूलीकणांचे प्रमाण वाढल्यास त्याचा कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या नागरिकांना धोका असतो.

करोना आटोक्यात आला असला, तरी पावसाळय़ापासून राज्यभरात दीर्घकाळ सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सध्याच्या हवेमुळे पुन्हा एकदा सर्दी-खोकल्याची साथ वाढण्याची भीती. हवेची गुणवत्ता पातळी खालावल्यास श्वास घेण्यास अडचणी, दम लागण्यासारखे प्रकार होऊ शकतात. वाईट पातळीवर असताना जास्त काळ घराबाहेर राहणे अपायकारक ठरू शकते.

हवेचा गुणवत्ता निर्देशांक किती असावा?

  • शून्य ते 50 एक्यूआय - उत्तम 
  • 50 ते 100 एक्यूआय - समाधानकारक 
  • 101 ते 200 एक्यूआय - मध्यम 
  • 201 ते 300 एक्यूआय - खराब 
  • 301 ते 400 एक्यूआय - अतिशय खराब 
  • 401 ते 500 एक्यूआय - गंभीर 

मागील 2 दिवसात राज्यातील शहरांमधील हवा गुणवत्ता निर्देशांक कसा होता? 

  • मुंबई - 221 एक्यूआय 
  • पुणे - 122 एक्यूआय 
  • अमरावती - 150 एक्यूआय 
  • औरंगाबाद - 253 एक्यूआय 
  • चंद्रपूर - 246 एक्यूआय 
  • कल्याण - 163 एक्यूआय 
  • नागपूर - 198 एक्यूआय 
  • नाशिक - 143 एक्यूआय 
  • ठाणे - 192 एक्यूआय 

दिवसेंदिवस वायु प्रदूषणात मुंबई आणि आजूबाजूच्या परिस्थितीतही वाढ होतेय. दुसरीकडे, खेळती हवा असलेल्या पुण्यातदेखील फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवा प्रदूषित झालीय. शहरांमधील हवेचे प्रदूषण दिवाळीतील फटाक्यांमुळे चिंताजनक वाटावे इतक्या गंभीर पातळीलाजाऊ लागले आहे. त्यामुळे वायु प्रदूषणात मुंबईची दिल्ली होण्याआधी तातडीनं उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालीय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget