एक्स्प्लोर

मुंबईत वांद्रे-वरळी सी-लिंकवर विचित्र अपघात; टोलनाक्यावर रांगेत उभ्या असलेल्या गाड्यांना मागून आलेल्या भरधाव गाडीची धडक, तिघांचा मृत्यू, 6 ते 7 जखमी

मुंबईतील वरळी-वांद्रे समुद्र सेतू अर्थात वरळी-वांद्रे सी लिंक हा मुंबईतील महत्त्वाच्या मार्गांपैकी एक. याच मार्गावर गुरुवारी रात्री विचित्र अपघात घडला. सहा वाहनांची एकमेकांना धडक बसल्यामुळे हा अपघात झाला आहे.

Mumbai See Link Accident: मुंबईतील (Mumbai News) वांद्रे-वरळी सी-लिंकवर (Bandra - Worli Sea Link) मोठा अपघात झाला. वांद्रे-वरळी सी-लिंकवरील टोलनाक्यावर रांगेत उभ्या असलेल्या गाड्यांना मागून भरधाव वेगात आलेल्या गाडीनं जोरदार धडक दिली. चार गाड्यांच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.  

मुंबईतील (Mumbai Accident Updates) वरळी-वांद्रे समुद्र सेतू अर्थात वरळी-वांद्रे सी लिंक (Bandra - Worli Sea Link Accident) हा मुंबईतील महत्त्वाच्या मार्गांपैकी एक. याच मार्गावर गुरुवारी रात्री विचित्र अपघात घडला. सहा वाहनांची एकमेकांना धडक बसल्यामुळे हा अपघात झाला आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर मुंबईतील भाभा रुग्णालय आणि लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेमकं काय घडलं? 

वरळीहून (Worli) वांद्र्याच्या दिशेनं भरधाव वेगात इनोव्हा कार जात होती. इनोव्हा कारमधून सहा प्रवासी प्रवास करत होते. ही इनोव्हा कार सर्वात आधी सी-लिंकवर मर्सिडीज गाडीला धडकली. त्यानंतर सुसाट वेगानं तिथून निघून गेली. पुढे जाऊन या कारनं वांद्रे सीलिंकवरील टोलनाक्यावर टोल भरत असलेल्या इनोव्हा आणि क्विड गाडीला पाठीमागून जोरदार धडक मारली. इनोव्हा गाडीच्या पाठोपाठ होंडा सिटी कारनंही इनोव्हा गाडीला धडक देत, वांद्रा-वरळी सी लिंकवरील टोल नाका 11 आणि 10 वरुन जाणाऱ्या टॅक्सिला धडक दिली. अचानक झालेल्या विचित्र अपघातामुळे सर्वजण पुरते घाबरले होते. 

वांद्रे वरळी सी लिंकवर झालेल्या विचित्र अपघातानंतर तात्काळ टोलनाक्यावर उपस्थित कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीनं सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे तीन जणांना मृत घोषित करण्यात आलं. अपघातात हनिफ पिर, ,हमाबीबी पिर ,खतीजा हटिया या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, असीम सदर, ,हजरा सदर, बीबी सदर, राजश्री दवे, राकेश दवे, अशी जखमींची नावं आहेत. अद्याप सर्व जखमींची नावं कळू शकलेली नाही. सर्व जखमींवर मुंबईतील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून चौकशी सुरू आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा

व्हिडीओ

Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ
Dog Attack Vastav EP 273: भटक्या कुत्र्यांनी महिलेला फाडून खाल्लं, चाकणमधील घटनेनंतर डोळे उघडणार का?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
Share Market : शेअर बाजारात अखेरच्या एका तासात चित्र पालटलं, सेन्सेक्स 938 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 75 हजार कोटींची कमाई
शेअर बाजारात अखेरच्या एका तासात चित्र पालटलं, सेन्सेक्स 938 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी दिलासा
Embed widget