एक्स्प्लोर

Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद

Snakebite Notified Disease Maharashtra : सर्पदंश 'अधिसूचित आजार' म्हणून घोषित केल्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयांना सर्पदंशाच्या प्रत्येक घटनेची व एएसव्ही लसीच्या साठ्याची नोंद ठेवणे बंधनकारक असेल.

Snakebite Notified Disease : राज्यातील सर्पदंशांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने एक मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ (Notified Disease) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्व शासकीय, खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि डॉक्टरांना सर्पदंशाच्या प्रत्येक संशयित, संभाव्य किंवा निश्चित घटनेची तसेच मृत्यूची नोंद आरोग्य प्राधिकरणाकडे करणे बंधनकारक असणार आहे.

या निर्णयामुळे सर्पदंशाच्या घटनांचे अचूक संनियंत्रण, रुग्णांवर वेळेत उपचार आणि सर्पविष प्रतिबंधक लस (ASV) उपलब्धतेचे योग्य नियोजन करणे शक्य होणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. ग्रामीण आणि दुर्गम भागात सर्पदंशाचा धोका सर्वाधिक असतो, त्यामुळे वेळेत उपचार मिळणे अत्यंत गरजेचे असते.

Snakebite Registration Mandatory : प्रत्येक घटनेची आणि उपचाराची तातडीने नोंद

शासनाच्या या नवीन अधिसूचनेनुसार, आरोग्य संस्था आणि डॉक्टरांना त्यांच्याकडे येणाऱ्या सर्पदंशाच्या प्रत्येक रुग्णाची माहिती संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा जिल्हा शल्यचिकित्सकांना कळवावी लागणार आहे. ही सर्व माहिती आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (HMIS/DHIS-2) किंवा एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत (IDSP) डिजिटल पद्धतीने नोंदवली जाईल. रुग्णाला देण्यात आलेल्या एएसव्ही (ASV) कुप्यांची संख्या, उपचाराचा परिणाम आणि संदर्भित माहितीचा तपशीलही त्यात समाविष्ट असेल.

Snakebite Nodal Authority : राज्यापासून जिल्ह्यापर्यंत नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

सर्पदंश प्रतिबंध व नियंत्रणासाठी विशेष प्रशासकीय रचना तयार करण्यात आली आहे. राज्यस्तरावर संचालक (रुग्णालये), जिल्हास्तरावर जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी तर महानगरपालिका क्षेत्रात वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांची 'नोडल अधिकारी' म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. हे अधिकारी संपूर्ण जिल्हयातील सर्पदंशाच्या घटनांवर आणि उपचारांच्या सुविधेवर थेट लक्ष ठेवतील.

ASV Vaccine Stock Management : एएसव्ही (ASV) लसीच्या साठ्यावर कडक नजर

उपचार करणाऱ्या प्रत्येक रुग्णालयाला सर्पविष प्रतिबंधक लस (ASV) साठ्याची, त्याच्या वापराची आणि शिल्लक साठ्याची अद्ययावत नोंद ठेवावी लागेल. ज्या भागात सर्पदंशाच्या घटना जास्त घडतात, त्या भागात लसीचा तुटवडा भासू नये यासाठी या माहितीच्या आधारे लसींचा पुरवठा तात्काळ केला जाईल.

Snakebite Prevention Measures : अभ्यासातून प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृती

सर्पदंशाच्या घटना आणि मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी घटनास्थळ, हंगाम आणि इतर घटकांचा अभ्यास केला जाणार आहे. या डेटाच्या आधारे स्थानिक पातळीवर जनजागृती मोहीम राबवली जाईल. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी "वेळेवर उपचार हाच जीव वाचविण्याचा मंत्र" असल्याचे सांगत, सर्पदंशाची प्रत्येक घटना नोंदवून अनमोल जीव वाचवण्याचे आवाहन केले आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
Advertisement

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake : मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
Maharashtra Live blog updates: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर बॉलिवूड कलाकारांना मुंबई पोलिसांचा सुरक्षा अलर्ट
Maharashtra Live blog updates: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर बॉलिवूड कलाकारांना मुंबई पोलिसांचा सुरक्षा अलर्ट
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
Embed widget