Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Buldhana news: वाढता कामाचा ताण व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावाने जीवन संपवल्याचा डॉक्टर संघटनांचा आरोप. कामाचा ताण वाढला आणि डॉक्टरांनी टोकांचं पाऊल उचललं

Buldhana Crime News: वैद्यकीय क्षेत्राला हादरा देणारी घटना बुलढाण्यातील मेहकर तालुक्यात घडली आहे. मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येणाऱ्या मांडवा फॉरेस्ट येथील आपला दवाखाना (Government Health center) येथे कार्यरत असलेल्या डॉ. संदीप प्रकाशराव हाडे यांनी 15 ऑगस्ट रोजी आपल्या दवाखान्याच्या बाहेर झेंडावंदन (flag salute) केले. त्यानंतर प्रकाशराव हाडे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील गोहगाव हाडे या आपल्या मूळगावी गेले. तिकडे जाऊन त्यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide news) केली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मेहकर तालुक्यातील घटनेने एकच खळबळ उडाली आहे. (Maharashtra Crime news)
उपकेंद्रामधील सुविधा आणि स्थितीची पाहणी करण्यासाठी नॅशनल क्वालिटी इन्शुरन्स स्टँडर्ड (NQAS)ही समिती काही दिवसांवरच मूल्यांकन करण्यासाठी येणार आहे. त्यामुळे उपकेंद्रामध्ये निकषानुसार आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध नसतानाही मूल्यांकनाची तयारी करून घेण्यासाठी वरिष्ठ दबाव टाकत असल्याचं व त्यातून मनुष्यबळ कमी असल्याने वाढता कामाच्या तणावाने त्यांनी आत्महत्या केल्याचं आपला दवाखाना वैद्यकीय अधिकारी संघटनेने म्हटले आहे. केंद्रीय आयुष्य व आरोग्य कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यात व त्यांच्याच मेहकर तालुक्यात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या आरोपामुळे बुलढाणा आरोग्य विभागात खळबळ उडाली असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रणजीत मंडले यांनी याप्रकरणी चौकशी समिती नेमली असून लवकरच अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे CHO संघटनेचे विभागीय अध्यक्ष डॉ. विशाल बाजड यांनी म्हटले.
Buldhana News: बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल
बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. सतत विविध आंदोलनांच्या माध्यमातून अन्यायाविरोधात आवाज उठवणारे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (Peoples Republican Party) जिल्हाध्यक्ष विजय पंढरीनाथ गवई (वय 48) यांनी चिखली येथील राहत्या घरी गळफास लावून घेत स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली असून, यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. चिखली येथील आपल्या राहत्या घरात विजय गवई यांनी टोकाचे पाऊल उचलले. सकाळी ही घटना निदर्शनास आल्यानंतर कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना खबर दिली. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
विजय गवई हे आक्रमक नेतृत्व आणि अन्यायाविरुद्ध सातत्याने लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी अचानक असे पाऊल का उचलले, यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. विजय गवई यांच्या अशा अकस्मात आणि दुर्दैवी जाण्याने पीपल्स रिपब्लिकन पार्टीसह संपूर्ण जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे चिखली शहरासह परिसरात शोककळा पसरली असून या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
आणखी वाचा






















