Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Twisha Sharma Death Case: 'हत्या झाली अन् पुरावे मिटवले'; कुटुंबीयांच्या गंभीर आरोपानंतर जबलपूर हायकोर्टाच्या निर्देशानुसार दुसरी उत्तरीय तपासणी झाली होती, दुसऱ्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्येही आत्महत्येचीच बाब समोर आली आहे.

Twisha Sharma Death Case: CBI नं मॉडल ट्विशा शर्मा हिच्या मृत्यूबाबत चार्जशीट दाखल केली असून या प्रकरणातील आणखी धागेदोरे समोर आले आहेत. ट्विशाच्या मृत्यूच्या अगदी आधीच्या अर्ध्या तासात नक्की काय घडलं? याचा धक्कादायक खुलासा तपासातून झाला आहे. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, मॉडल ट्विशा शर्माच्या मृत्यूच्या (Twisha Sharma Death Case) आधीच्या 30 मिनिटांमधील घटनाक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. तपासातून असं समोर आलंय की, त्यावेळी ट्विशा तीव्र मानसिक तणावाखाली होती आणि घटनेच्या काही काळ आधीच तिनं आपल्या पालकांशी संवाद साधला होता.(Twisha Sharma Death Case)
मध्य प्रदेशातील मॉडल ट्विशा शर्मा यांच्या मृत्यू प्रकरणाबाबत सीबीआयनं एक महत्त्वाची माहिती दिली आहे. CBI नं 636 पानांचं आरोपपत्र दाखल केलं असून, त्यात हा मृत्यू आत्महत्येचा प्रकार असल्याचं नमूद केलं आहे. सीबीआयनं सांगितलंय की, दुसऱ्या शवविच्छेदन अहवालातूनही आत्महत्येच्या निष्कर्षाला दुजोरा मिळाला आहे. यापूर्वी ट्विशा शर्माच्या कुटुंबीयांनी सुरुवातीच्या शवविच्छेदन अहवालावर आक्षेप घेतलेला आणि गंभीर आरोप केलेले. शवविच्छेदन अहवालातील तथ्यांशी छेडछाड केल्याचं ट्विशा शर्माच्या कुटुंबीयांनी आरोप केलेला. ट्विशाची गिरिबाला सिंह यांच्या प्रभावामुळे शवविच्छेदन तथ्यांमध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप ट्विशाचे आई-वडील आणि भावानं केला होता. तसेच, ट्विशाची हत्या झाल्याचीही शक्यता त्यांनी वर्तवली होती.(Twisha Sharma Death Case)
Twisha Sharma Death Case: मृत्यूच्या आधी वहिनीसोबत केलेलं शेवटचं संभाषण
"त्याला सांग की आपल्या बायकोच्या (माझ्या) उरल्यासुरल्या गोष्टी घेऊन जा. पण उद्या. मला आत्ता शांततेत मरु दे" असा शेवटचा मेसेज मॉडेल-अभिनेत्री ट्विशा शर्मा हिने आयुष्य संपवण्याच्या काही मिनिटे आधी आपल्या वहिनीला पाठवलेला होता. भोपाळच्या न्यायालयात सोमवारी दाखल करण्यात आलेल्या सीबीआयच्या आरोपपत्रात ही माहिती देण्यात आली आहे. 12 मे रोजी रात्री 9.36 वाजता ट्विशाने वहिनी राशी अब्रोल शर्मा हिला हा मेसेज पाठवला होता. त्याआधी तिने अनेक फोन कॉल्स आणि मेसेजद्वारे पती समर्थ सिंग याच्यासोबतच्या सुरू असलेल्या समस्यांबाबत चर्चा केली होती.
Twisha Sharma Death Case: दिल्ली AIIMS नं केलं दुसरं पोस्टमार्टम
ट्विशाचे कुटुंबीय आक्षेप घेतल्यानंतर जबलपूर हायकोर्टाच्या आदेशामुळे दिल्ली AIIMS ची टीम भोपाळला पोहोचलेली आणि भोपाळच्या AIIMS मध्ये दुसऱ्यांदा पोस्टमार्टम करण्यात आला. आता दुसऱ्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्येही आत्महत्येचीच बाब समोर आली आहे.
Twisha Sharma Death Case: ट्विशाचा नवरा आणि सासू यांच्या विरोधात आरोपपत्र
मॉडेल-अभिनेत्री ट्विशा शर्मा हिच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात सीबीआयनं समर्थ सिंह आणि गिरीबाला सिंह यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. यापूर्वी, ट्विशा शर्मा हिचा हुंड्याशी संबंधित कथित मृत्यू झाल्याच्या प्रकरणात, आरोपी, निवृत्त जिल्हा न्यायाधीश गिरीबाला सिंग आणि त्यांचा मुलगा समर्थ सिंग, यांची न्यायालयीन कोठडी 11ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. नियमित दंडाधिकारी रजेवर असल्याने, या प्रकरणाची सुनावणी 'ड्युटी मॅजिस्ट्रेट' (कर्तव्यस्थ दंडाधिकारी) यांच्यासमोर झाली. दोन्ही आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाले.
ट्विशा शर्मा यांच्या कुटुंबाची बाजू मांडणारे वकील शुभांग दीक्षित यांनी 'आयएएनएस'ला (IANS) सांगितले की, तपास अजूनही सुरू असल्याचे सीबीआयचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढवण्याचा अर्ज मंजूर केला. सुनावणीदरम्यान, आवाज नमुने (voice samples) देण्याबाबत सहकार्य केले नाही, या सीबीआयच्या आरोपाला आरोपींनी विरोध केला. तसेच, आवाज नमुने घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचे वर्तन अयोग्य होते, असा आरोपही बचाव पक्षाने केला आणि त्याबाबत न्यायालयासमोर आक्षेप नोंदवला.
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग





















