Mumbai Accident : संसार थाटण्याचं डोळ्यात स्वप्न, पण त्याआधीच काळाचा घाला, बेस्ट बसने चिरडल्यानं 25 वर्षीय तरण्या पोराचा मृत्यू
Mumbai Accident : बेस्ट बसने चिरडल्याने एका 25 वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय.
Mumbai Accident : बेस्ट बसच्या अपघातांची मालिका थांबता थांबत नाहीये. गोराई येथे बसच्या चाकाखाली आल्याने एका 25 वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय. गोराई बस आगाराजवळ असलेल्या एलटी मार्गावर मंगळवारी (दि. 21) ही घटना घडलीये. वैभव कांबळे असं अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
तरण्या मुलाचा अपघाती मृत्युमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर
अधिकची माहिती अशी की, गोराई बस आगाराजवळ असलेल्या एलटी मार्गावर दुचाकीला बेस्ट बसची धडक बसल्याने हा वैभव कांबळे याचा मृत्यू झालाय. वैभव हा गोराईतील नंदनवन या इमारतीत राहात होता. काही दिवसांपासून वैभवच्या लग्नाची बोलणी सुरु होती. तो घरातील एकूलता एक मुलगा होता. दरम्यान, वैभवच्या अपघाती मृत्युमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. याप्रकरणी बेस्ट बसच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. संदेश श्रीकांत सुतार (वय 32) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचं नाव आहे.
बस चालकावर गुन्हा दाखल
अपघात झाला त्यावेळी बसचालक भरधाव वेगाने बस चालवत असल्याचे समोर आले आहे. दुचाकीस्वाराला ओव्हरटेक करण्याच प्रयत्न बस चालकाकडून सुरु होता , त्यावेळीच बेस्ट बसने त्याला पाठिमागून धडक दिली. या अपघातानंतर दुचाकीस्वार वैभव कांबळे खाली कोसळला. त्यानंतर त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी वैभवचे वडील विजय कांबळे यांच्या तक्रारीवरून बोरिवली पोलिसांनी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Gondia Accident : गोंदियात बुलेरोची दुचाकीला मागून धडक, 5 महिन्यांच्या बाळासह तीन जणांचा दुर्दैवी अंतhttps://t.co/yMWYnyYjuy
— ABP माझा (@abpmajhatv) January 26, 2025
इतर महत्त्वाच्या बातम्या