एक्स्प्लोर

Mount Mary Fair 2022 : आजपासून 'माऊंट मेरी' जत्रेला सुरुवात, 'मोत माऊली'च्या दर्शनाला लाखो भाविक

Mount Mary Fair 2022 : मुंबईतील प्रसिद्ध 'माऊंट मेरी' जत्रेला (Mount Mary Fair) म्हणजेच 'मोत माऊली'च्या जत्रेला आजपासून सुरुवात होत आहे. या जत्रेला 'वांद्रे महोत्सव' (Bandra Fest) असंही म्हटलं जातं.

Mount Mary Fair 2022 : मुंबईतील प्रसिद्ध 'माऊंट मेरी' जत्रेला (Mount Mary Fair) म्हणजेच 'मोत माऊली'च्या जत्रेला आजपासून सुरुवात होत आहे. या जत्रेला 'वांद्रे महोत्सव' (Bandra Fest) असंही म्हटलं जातं. ही मुंबईतील मोठी जत्रा असते. लाखो भाविक मोत माऊलीच्या दर्शनाला येत असतात. रविवारी 11 सप्टेंबर पासून माऊंट मेरीच्या जत्रेला सुरुवात होत असून हा महोत्सव 18 सप्टेंबरपर्यंत सुरु असणार आहे. या जत्रेला 100 वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्ष ही जत्रा रद्द करण्यात आली होती. 2020 आणि 2021 साली कोरोनामुळे या जत्रेवर निर्बंध लावण्यात आले होते. मात्र आता दोन वर्षांनंतर ही जत्रा भरवण्यात येत आहे. या जत्रेला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. माऊंट मेरी चर्चमध्ये भाविक नवस मागण्यासाठी येतात आणि माऊंट मेरी समोर मेणबत्ती लावून नवस मागतात.

माऊंट मेरी जत्रेचं थेट प्रक्षेपण

'माऊंट मेरी जत्रे'चे यंदा प्रथमच युट्बूब आणि ट्विटरवर थेट प्रक्षेपण होणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष या यात्रेचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. या यात्रेला शतकाहून अधिक परंपरा आणि वारसा लाभलेला आहे. त्यामुळेच आता ही यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 

चर्च ऑथॉरिटीने दिलेल्‍या माहितीनुसार, यंदा जत्रेला एक लाख भाविक दर्शनासाठी आणि जत्रेसाठी येतील अशी शक्यता आहे. येणाऱ्या भाविकांच्‍या सोयीसाठी आणि स्‍थानिक परिसरातील गर्दी टाळण्‍यासाठी मुंबई वाहतुक पोलिसांच्‍या सहयोगाने वाहतुकीचे मार्ग निश्चित करण्‍यात आले आहेत. 

कोविडविषयक बंधने शिथील झाल्‍यामुळे व धार्मिक स्‍थळे जनसामान्‍यांसाठी खुली केल्‍यामुळे तसेच सर्व सण, महोत्सव, जत्रा, यात्रा निर्बंधमुक्त झाल्यामुळे सालाबादप्रमाणे या वर्षी या यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. 2020 आणि 2021 साली कोरोनामुळे जत्रेचे आयोजन करण्यात आले नव्हते. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात आलेल्या सुविधा - 

  • 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
  • रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती
  • पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था
  • कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे करावी यासाठी स्वतंत्र व्यवस्था
  • भाविकांच्या सुविधेसाठी फिरत्या शौचालयांची व्यवस्था
  • अनधिकृत स्‍टॉल्‍स, अनधिकृत फेरीवाले यांना मज्‍जाव
  • 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत
  • प्रथमोपचार आणि वैद्यकीय सुविधांकडे लक्ष
  • देखरेख कक्ष आणि निरिक्षण मनोरा

महत्त्वाच्या इतर बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Embed widget