Mumbai Local Train Mega Block : रविवारी घराबाहेर पडताय? मध्य आणि हार्बर मार्गावर 'मेगाब्लॉक', ही बातमी नक्की वाचा...
Mumbai Local Train Mega Block : मुंबई लोकल मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक जरुर तपासा.
Mumbai Local Train Mega Block 11 Sept : मुंबईकरांनो आज घराबाहेर पडण्याच्या विचारात असाल आणि लोकलने प्रवास करायचं ठरवलं असेल, तर लोकलचं वेळापत्रक नक्की तपासा. कारण आज लोकल मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची देखभाल, सिग्नल यंत्रणा दुरुस्ती ओव्हरहेड वायर यांसारख्या कामांसाठी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन लोकल मार्गावर मेगाब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.32 वाजेपर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबून पुन्हा डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत
ठाणे येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 वाजेपर्यंत अप धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. पुढे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
पनवेल/बेलापूर येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल करीता जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागामध्ये विशेष उपनगरी (लोकल) ट्रेन चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/ नेरुळ - खारकोपर लाईन सेवा उपलब्ध असतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या