एक्स्प्लोर
बीएमसीच्या कार्यालयांमधून महिन्याला दोन लैंगिक छळाच्या तक्रारी
कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून किंवा सहकाऱ्यांकडून झालेल्या लैंगिक शोषणाबाबत या चळवळीतून वाचा फोडली जात आहे. याच धर्तीवर मुंबई महापालिकेतलं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

मुंबई : सध्या सोशल मीडिया आणि इतर सर्वच क्षेत्रात #MeToo ही मोहिम जोरात सुरु आहे. आपल्यावर झालेल्या लैंगिक छळाबाबत महिला बिनधास्तपणे आवाज उठवत आहेत. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून किंवा सहकाऱ्यांकडून झालेल्या लैंगिक शोषणाबाबत या चळवळीतून वाचा फोडली जात आहे. याच धर्तीवर मुंबई महापालिकेतलं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
'तारा'फेम अभिनेत्रीकडून विनिता नंदा यांना दुजोरा
मुंबई महापालिकेअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापने, कार्यालयांमधून महिन्याला दोन लैंगिक छळाच्या तक्रारी येत असल्याची माहिती समोर आली आहे. दर महिन्याला या महानगरपालिकेत काम करणार्या दोन महिला लैंगिक अत्याचाराच्या बळी पडत आहेत.#MeeToo : काय, कधी, कुठे, का आणि कुणाकडून सुरुवात? वाचा सर्व काही
गेल्या सात वर्षात मुंबई महापालिकेत एकूण 179 लैंगिक शोषण, लैंगिक छळाच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेची कार्यालये, रुग्णालये, शाळा शहरात ठिकठिकाणी आहेत. शहराव्यतिरिक्त तलावांच्या ठिकाणीही पालिकेचे कर्मचारी काम करत असतात. पालिकेत सध्या 1 लाख 5 हजार कर्मचारी असून त्यापैकी सुमारे 40 टक्के इतके प्रमाण हे महिला कर्मचार्यांचं आहे.#MeToo वादळ मोदींच्या मंत्रिमंडळात, राज्यमंत्री एम जे अकबरांवर शोषणाचे आरोप
लैंगिक अत्याचार विरोधी प्रतिबंधक पाऊल म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पालिकेकडून 2003 मध्ये लैंगिक छळ प्रतिबंधक कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र या नावाने समिती गठित करण्यात आली आहे. वर्ष दाखल तक्रारी 2011 6 2012 15 2013 32 2014 34 2015 31 2016 37 2017 24आणखी वाचा























