MNS March Live | माझा देश म्हणजे धर्मशाळा आहे का?; राज ठाकरेंची तोफ धडाडली
LIVE
Background
मुंबई : पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोऱ्यांविरोधात आज मनसेचा मुंबईत मोर्चा होणार आहे. गिरगाव ते आझाद मैदान हा मोर्चा निघणार आहे. यासाठी आझाद मैदानात मोठा स्टेजही बांधण्यात आला आहे. केवळ मुंबईतूनच नाही तर ठाणे, नाशिक, पुण्यातूनही मनसेचे कार्यकर्तेही मुंबईत मोर्चासाठी दाखल झाले आहेत. राज्यभरातून 1 ते 2 लाख लोक मोर्चासाठी येण्याची शक्यता आहे. आझाद मैदानावर तयारी सुरू झाली आहे..
पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरुद्धचा मोर्चा अभूतपूर्व करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नाशिक आणि राज्यभरातल्या इतरही प्रमुख शहरात मनसेने जय्यत तयारी केली आहे. मुंबईतल्या नाक्यानाक्यांवर मनसेचे बॅनर लागले आहेत. रस्ते आणि उड्डाणपूल मनसेच्या झेंड्यांनी भगवे झाले आहेत.
मोर्चात सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते घरोघरी जाऊन पत्रकं वाटत आहेत. लोकांना मोर्च्यात सामील होण्याचं आवाहन केलं जातं आहे. मनसे कार्यकर्त्यांनी प्रत्य़ेक चौकात बूथ तयार केले आहेत. मोर्चा कसा निघणार याची माहिती ते लोकांना देत आहेत. फिरत्या गाड्यांमधूनही लोकांना मोर्चात सामील होण्याचं आवाहन केलं जात आहे. मनसेच्या मोर्च्यासाठी भगव्या आणि काळ्या रंगाचे टी शर्ट छापण्यात आले आहेत. पदाधिकाऱ्यांसाठी कुर्तेही तयार करण्यात आले आहेत. रिस्ट बँडही तयार करण्यात आले आहेत. उद्याच्या मोर्च्यात मनसैनिकांच्या डोक्यावर गांधी टोपी दिसणार आहे. भगव्या रंगातल्या या टोपीवर राजमुद्रा आणि मनसेची निशाणी छापण्यात आली आहे.
सीएएला विरोध मात्र एनआरसीचं समर्थन, मनसेची भूमिका बाळा नांदगावकरांकडून स्पष्ट
दरम्यान मोर्च्याच्या आधी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मनसेत प्रवेश केलाय. प्रकाश महाजनांनीही मनसेचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. राज ठाकरेंनी याआधीही रझा अकादमीच्या विरोधात मोर्चा काढला होता. पण यावेळचा मोर्चा हा सुनियोजित आहे. पक्षाच्या बदलेल्या धोरणाची किनार या मोर्चाला आहे. त्यामुळं हा मोर्चा अभूतपूर्व करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. आता उद्या राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
ABP Majha LIVE | MNS MahaMorcha Live Updates | Marathi LIVE News
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://abpmajha.abplive.in/ Social Media Handles: Facebook: https://www.faceboo...