एक्स्प्लोर

मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळेंना हायकोर्टाचा दिलासा, हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन 

मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे (Gajanan Kale) यांना हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. घरगुती हिंसाचार प्रकरणात दाखल गुन्ह्यात काळे यांना हायकोर्टानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

मुंबई : मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांना हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. घरगुती हिंसाचार प्रकरणात दाखल गुन्ह्यात काळे यांना हायकोर्टानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पत्नीचा मानसिक, शारिरीक छळ, मारहाण आणि परस्त्रीबरोबर अनैतिक संबंध असल्याचा तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेल्या गजानन काळे यांच्या अटकपूर्व जामीनावर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी आपला राखून ठेवलेला निकाल बुधवारी जाहीर केला. नवी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या या गुन्ह्यामुळे भोवर्‍यात अडकलेल्या मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांना या निकालामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आपल्याविरोधातील सर्व आरोप चुकीचे असून हा निव्वळ पतीपत्नी यांच्यातील बेबनाव असल्याचा प्रकार आहे असं काळे यांच्यावतीनं हायकोर्टात सांगण्यात आलं होतं.

काळे यांच्या पत्नीनं काही दिवसांपूर्वी नेरूळ पोलीस ठाण्यात याबाबत रितसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी मानसिक आणि शारिरीक छळ करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी कलमांखाली गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अटकेची शक्यता निर्माण झाल्यानं काळे यांनी प्रथम ठाणे सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायाधीश जी.पी शिरसाठ यांनी फेटाळला लावला आहे. त्या निकालाविरोधात काळे यांनी हायकोर्टात धाव घेत त्याला आव्हान देत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. दरम्यान गजानन काळे यांच्या या याचिकेला विरोध करत त्यांच्या पत्नी आणि मूळ तक्रारदार यांनीही हायकोर्टात मध्यस्थ याचिका दाखल केली होती जी कोर्टानं फेटाळून लावली. मात्र काळे यांच्या पत्नी हायकोर्टाच्या या निकालाला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.

त्या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर मागील बुधवारी सुनावणी झाली होती. यावेळी सरकारी वकीलांनी या संदर्भात माहिती घेण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला होता. याची दखल घेत न्यायालयानं याचिकेची सुनावणी 7 सप्टेंबरपर्यंत तहकूब ठेवली होती. तोपर्यंत काळे यांच्या विरोधात कोणतीही कठोर कारवाई करू नका असे निर्देश नवी मुंबई पोलीसांना दिले होते. गजानन काळे यांच्या या याचिकेला विरोध करत त्यांच्या पत्नी आणि मूळ तक्रारदार यांनीही हायकोर्टात मध्यस्थ याचिका दाखल केली होती.

मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजाजन काळे यांना हायकोर्टाचा दिलासा, 7 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश

संजिवनी काळे यांचे गंभीर आरोप
गजानन काळे यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा फायदा उचलून मोठ्या प्रमाणात काळी माया गोळा केली आहे. शिक्षण प्रवेश आणि मनपा अधिकाऱ्यांना धाक दाखवून करोडो रुपये गजानन काळे यांनी गोळा केले. याबाबत तपास होणार असेल तर आपण यंत्रणेला सगळी माहिती देण्यास तयार आहोत असे पत्नी संजिवनी काळे यांनी सांगितलं होतं. घरात जास्त दिवस रोकड न ठेवता अन्य व्यक्तीच्या नावावर सर्व रोकड बँकेत जमा करायचा. ही रोकड घेऊन येणाऱ्या चार कार्यकर्त्यांची नावेही त्यांनी सांगितली आहेत. लाखो रुपये गोळा करून हे कार्यकर्ते घरी यायचे. एबी नावाच्या बोगस कंपनीच्या नावाने सर्व आर्थिक व्यवहार करण्यात आले आहेत. सदनिका, चार चाकी वाहने, मोबाईल अशा सर्व गोष्टींचे व्यवहार याच कंपनीच्या नावावर करण्यात आल्याचा गौप्यस्फोट संजीवनी यांनी केल्याने गजानन काळे यांच्या अडचणीत भर पडली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hrithik Roshan Luxury House : सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
Sukesh Chandrashekhar : 7640 कोटींचा कर देतो, भारतात गुंतवणूक करतो, ठग सुकेश चंद्रशेखर याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र?
सुकेश चंद्रशेखर तुरुंगात पण विदेशात कमाई? 7640 कोटींचा कर द्यायचाय, अर्थमंत्र्यांना पत्र लिहिलं?
Amit Shah :  कार्यकर्त्यांनी असं लढावं की विरोधकांना बसायला एकही जागा मिळू नये, अमित शाहांचा शिर्डीत भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र
स्थानिक स्वराज्य संस्थेत एका एका जागेवर सगळ्यांचा सुपडा साफ करा,शाहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 at 07AM Superfast 13 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याMajha Gaon Majha Jilha at 630AM 13 January 2025 माझं गाव, माझा जिल्हाABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 13 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्ससकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 13 January 2025   Top 100  06AM Superfast

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hrithik Roshan Luxury House : सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
Sukesh Chandrashekhar : 7640 कोटींचा कर देतो, भारतात गुंतवणूक करतो, ठग सुकेश चंद्रशेखर याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र?
सुकेश चंद्रशेखर तुरुंगात पण विदेशात कमाई? 7640 कोटींचा कर द्यायचाय, अर्थमंत्र्यांना पत्र लिहिलं?
Amit Shah :  कार्यकर्त्यांनी असं लढावं की विरोधकांना बसायला एकही जागा मिळू नये, अमित शाहांचा शिर्डीत भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र
स्थानिक स्वराज्य संस्थेत एका एका जागेवर सगळ्यांचा सुपडा साफ करा,शाहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Nashik Accident: सोशल मीडियावर स्टेटस टाकलं अन् पुढच्या काही क्षणांत भीषण अपघात, लोखंड सळ्या अंगात शिरल्याने पोरसवदा तरुणांनी जागेवरच प्राण सोडला
नाशिकमध्ये भीषण अपघात, लोखंडी सळ्या अंगात शिरल्याने 6 तरुणांचा मृत्यू, शेवटचं स्टेटस व्हायरल
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Embed widget