एक्स्प्लोर
Advertisement
सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेचं 'शॅडो कॅबिनेट' निश्चित; राज ठाकरे उद्या घोषणा करणार
सरकारवर वचक ठेवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शॅडो कॅबिनेट निश्चित झालं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे उद्या या कॅबिनेटची घोषणा करण्याची शक्यता आहे. यात नांदगावकर, सरदेसाई, देशपांडे, पानसेंचा समावेश असण्याची शक्यता आहे.
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी मनसेच्या शॅडो कॅबिनेट निश्चित झाल्याची माहिती मिळतेय. या शॅडो कॅबिनेटमध्ये एकूण 28 नेत्यांचा समावेश करण्यात आल्याचं समजतंय. त्यात बाळा नांदगावकर, संदिप देशपांडे, अभिजित पानसे, नितीन सरदेसाई आणि अमेय खोपकर यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. उद्या या शॅडो कॅबिनेटची घोषणा होण्याची शक्यता आहे. कृष्णकुंजवर आज मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये जवळपास अडीच तास शॅडो कॅबिनेटवर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. उद्या मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त नवी मुंबईत हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्याची शक्यता आहे.
9 मार्च 2020, महाराष्ट्र नवनिर्मिण सेनेचा 14 वा वर्धापन दिवस आहे. याच दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा करणार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी मनसेच्या शॅडो कॅबिनेट निश्चित झाल्याची माहिती मिळतेय. या शॅडो कॅबिनेटमध्ये एकूण 25-28 नेत्यांचा समावेश करण्यात आल्याचं समजतंय.
एबीपी माझाला हाती लागली आहे मनसेच्या संभाव्य शॅडो कॅबिनेटची यादी
बाळा नांदगावकर - गृह
संदिप देशपांडे - नगरविकास
अमेय खोपकर - सांसकृतिक, गढ किल्ले
नितीन सरदेसाई - वित्त
अभिजीत पाणसे - शाळीय शिक्षण
गजानन राणे - कामगार
योगेश परुळेकर - पीडब्ल्यूडी
दिलीप धोत्रे - सहकार
संजय नाईक - परिवाहन
कृषि - राजू उंबरकर
रीटा गुप्ता - महिला, बाल कल्याण
लॉ एंड जूडिशीएरी - किशोर शिंदे
या शिवाय पक्षाचे नेते अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत, रणजित शिरोडकरही या शॅडो कॅबिनेटमध्ये असणार आहेत. तसंच अमित ठाकरे यांचं नाव या कैबिनेटमध्ये सध्या नाही. त्यांच्या नावावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
शॅडो कॅबिनेट विषयी आज कृष्णकुंजवर मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये जवळपास अडीच तास शॅडो कॅबिनेटवर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. उद्या मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त नवी मुंबईत हा कार्यक्रम पार पडणार आहे. 23 जानेवारीला मनसेच्या महाअधिवेशनात बाळा नांदगावकरांनी शॅडो कॅबिनेटची घोषणा केली होती. त्यानुसार ठाकरे सरकारवरील कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी खातेनिहाय मनसे नेत्यांना जबाबदारी दिली जाईल. प्रत्येक नेत्याकडे मिळालेल्या संबंधित खात्यातील कारभार आणि त्रुटी शोधून सरकारला जाब विचारण्याचं काम असेल. शॅडो कॅबिनेट ही अनौपचारिक असून या कॅबिनेटचा कोणताही निर्णय अनिवार्य नसतो.
लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला प्रचंड महत्त्व आहे. पश्चिम देशांमध्ये सरकारवर नजर ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेट ही संकल्पना अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मनसेनेही आता शॅडो कॅबिनेट आणत आहे. मात्र, राज्यात शॅडो कॅबिनेटचा प्रयोग होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही दिवंगत नेते विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना शिवसेना आणि भाजपने शॅडो कॅबिनेटचा प्रयोग केला होता. 2005 मध्ये आघाडी सरकारला लक्ष्य करण्यासाठी शिवसेना आणि भाजपने शॅडो कॅबिनेटची स्थापना केली होती.
Shadow Cabinet | शॅडो कॅबिनेट म्हणजे काय?
MNS | मनसेचा उद्या वर्धापनदिन; राज ठाकरे करणार शॅडो कॅबिनेटची घोषणा? | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement