एक्स्प्लोर

Shadow Cabinet | शॅडो कॅबिनेट म्हणजे काय?

मनसेनं आता राज्य सरकारच्या कारभारावरही लक्ष ठेवण्याचा निर्धार केलेला दिसतोय. दुपारच्या सत्रात मनसे नेते नितीन सरदेसाई शॅडो कॅबिनेटची घोषणा करणार आहेत. पण शॅडो कॅबिनेट म्हणजे काय?

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेने आता राज्य सरकारच्या कारभारावरही लक्ष ठेवणार आहे. मनसे नेते नितीन सरदेसाई शॅडो कॅबिनेटची घोषणा करणार आहेत. पण शॅडो कॅबिनेट म्हणजे काय? तर शॅडो कॅबिनेट म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर विरोधकाचं मंत्रिमंडळ. कोणत्याही पंतप्रधानांचं किंवा मुख्यमंत्र्याचं जसं मंत्रिमंडळ असतं तसंच मंत्रिमंडळ विरोधी पक्षांकडून स्थापन केलं जातं. या मंत्र्यांना सत्ताधारी मंत्र्यांप्रमाणे कोणतेही अधिकार नसले तरी त्यांनी सत्ताधारी मंत्र्यांवर आपल्या अभ्यासाने वचक ठेवणं अपेक्षित असतं. थोडक्यात सरकारच्या कामकाजवर लक्ष ठेवण्यासाठी देखरेख ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेट या संकल्पनेचा वापर केला जातो. ही पाश्चिमात्य देशातली संकल्पना आहे. राज्यशास्त्रात या संकल्पनेला खूप महत्वाचं स्थान देण्यात आलं आहे. विरोधकांनी स्थापन केलेल्या शॅडो कॅबिनेटमध्ये सत्ताधारी गटाने जी लोकोपयोगी खाती किंवा विभाग तयार केलेले असतात, त्या विभागाचे, विषयाचे जाणकार किंवा तज्ज्ञ असावेत अशी अपेक्षा असते. म्हणजे सरकारच्या संबंधित खात्याच्या एखाद्या मंत्र्याने एखादा निर्णय घेतला तर त्याचं योग्य विश्लेषण करण्याची शॅडो कॅबिनेटमधील मंत्र्यांची क्षमता असावी हे अपेक्षित असतं. शॅडो कॅबिनेटमधील मंत्र्यांना शॅडो मंत्री म्हटलं जातं. त्यांच्या विश्लेषणाला किंवा टीका-टिप्पणीला सत्ताधारी मंत्र्यांइतकंच स्थान प्रसारमाध्यमांमध्ये मिळतं. शॅडो कॅबिनेटचा प्रमुख म्हणजे संबंधित सरकारमधील विरोधी पक्षनेता असतो. पाश्चिमात्य देशात सत्ताधारी गटाने त्यांच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप केल्यानंतर विरोधकांच्या शॅडो कॅबिनेटची जनतेला उत्सुकता असते. यामुळे राज्यकर्त्यांवर वचक राहतो. शॅडो कॅबिनेटमधील मंत्री जास्त अभ्यासू आणि तज्ञ आहेत की सरकारमधील मंत्री यावरही युरोपीय देशात चर्चा होतात. विरोधकांच्या शॅडो कॅबिनेटमुळे सत्ताधारी गटांना अनिर्बंध किंवा मनमानी कारभार करता येत नाही. कारण त्यांच्या निर्णयाचा जाब विचारण्यासाठी शॅडो कॅबिनेटमधील मंत्री तत्पर असतात. महाविकास आघाडी सरकारवर मनसेची नजर, मंत्रीमंडळावर शॅडो कॅबिनेटची नेमणूक करणार पाश्चिमात्य देशातल्या विरोधकांच्या शॅडो कॅबिनेटमधील मंत्र्यांना सत्तापालट झाल्यानंतर शॅडो कॅबिनेटमध्ये त्यांच्याकडे असलेल्या खात्याचीच जबाबदारी प्राधान्याने दिली जाते. आपल्याकडे शॅडो कॅबिनेटच्या प्रयोगाची घोषणा अनेकवेळा झाली आहे. मात्र एकदाही त्याचं परिपूर्ण रुप पाहायला मिळालेलं नाही. आपल्याकडे एखाद्या विषयातील तज्ञ जाणकारापेक्षा संबंधित पक्षाच्या नेतृत्वाला किंवा त्या पक्षांच्या ध्येयधोरणांविषयी निर्णय घेणाऱ्या हायकमांडकडेच सर्वाधिकार एकवटलेले असल्यामुळे त्याच्याच मताला सर्वाधिक प्रसिद्धी किंवा अधिकृत मताचा दर्जा मिळतो. त्यामुळे आपल्याकडे शॅडो कॅबिनेटचे प्रयोग राजकीयदृष्ट्या फारसे यशस्वी झालेले नाहीत. आपल्याकडे विरोधी पक्षांकडून अनेकदा केवळ विरोधासाठीच विरोध हे धोरण राबवलं जात असल्यामुळे सरकारच्या कोणत्याही निर्णयाचा काहीही तर्क लावून फक्त विरोधच करायचा हे सूत्रही अनेकदा पाहायला मिळतं. त्यामुळेच आपल्याकडे शॅडो कॅबिनेट ही संकल्पना फारशी रुजलेली नाही. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर केंद्रात मोदी सरकार सत्तेत आलं तेव्हा विरोधी पक्षनेतेपद ही न मिळालेल्या काँग्रेसने शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याची घोषणा केली होती. काँग्रेसने अनेक टर्म संबंधित खात्याचं मंत्रिपद भूषवलेल्या तसंच त्या त्या विषयातील जाणकार असलेल्या ज्येष्ठ नेत्यांची समिती जाहीर करत शॅडो कॅबिनेटची घोषणा केली होती. मात्र आपल्याकडे नेत्यांना सरकारच्या प्रत्येक विषयात मत द्यायचं असल्यामुळे काँग्रेसने मोठ्या अपेक्षेने केलेला हा प्रयोग फारसा चर्चेत आला नाही. 2019 च्या निवडणुकांपूर्वी केंद्रातल्या मोदी सरकारविरुद्ध राज्याराज्यातल्या विरोधी पक्षांची एकजूट पश्चिम बंगालमध्ये करण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी मोदी सरकारचे देशभरातले विरोधक एकवटले होते. त्या वेळी झालेल्या जाहीर सभेतही शॅडो कॅबिनेट स्थापन करुन केंद्रांच्या धोरणांचा मुद्देसूद विरोध करण्याचा निर्णय झाला होता. मात्र हा प्रयोगही घोषणेप्रमाणेच अल्पायुषी ठरला. आपल्याकडे जेव्हा जेव्हा मोठ्या कालावधीनंतर विरोधकांची किंवा बिगर काँग्रेसी पक्षांची सत्ता आली तेव्हा तेव्हा शॅडो कॅबिनेटचा प्रयोग चर्चेत येतो.

गेल्या १४ वर्षांपासून एबीपी माझामध्ये कार्यरत.. सुरवातीला टीव्ही आणि त्यानंतरच्या दहाएक वर्षांपासून डिजिटल.. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Kashmera Shah on Govinda and Sunita: गोविंदाच्या रुमर्ड गर्लफ्रेंडवर सूनबाई भडकली; सुनीता आहुजाला सपोर्ट करत म्हणाली..., पोस्ट Viral
गोविंदाच्या रुमर्ड गर्लफ्रेंडवर सूनबाई भडकली; सुनीता आहुजाला सपोर्ट करत म्हणाली..., पोस्ट Viral
Taurus Monthly Horoscope October 2026 : वृषभ राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबरचा महिना ठरणार गेमचेंजर; महिन्याच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
वृषभ राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबरचा महिना ठरणार गेमचेंजर; महिन्याच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
ठाण्यातील युट्युब भाईला महिलांकडून पोलीस ठाण्यातच मारहाण; पोलिसांसमोरच घडला प्रकार
ठाण्यातील युट्युब भाईला महिलांकडून पोलीस ठाण्यातच मारहाण; पोलिसांसमोरच घडला प्रकार
Swarda Thigale Baby Girl: मुलगी झाली हो!प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट; 7 दिवसानंतर दिली गुडन्यूज, कारण...
मुलगी झाली हो!प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट; 7 दिवसानंतर दिली गुडन्यूज, कारण...

व्हिडीओ

Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे
Mobile Recharge New Rules : आता 30 दिवस चालणार मोबाईल रिचार्ज
Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: 'आई गं, मी कशी काय फसले? जाळ्यात अडकली, चुकले, माफ करा...', मित्रानं मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला, अश्लील फोटो अन्..., नाशिकमध्ये विवाहितेने जीवन संपवलं
'आई गं, मी कशी काय फसले? जाळ्यात अडकली, चुकले, माफ करा...', मित्रानं मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला, अश्लील फोटो अन्..., नाशिकमध्ये विवाहितेने जीवन संपवलं
Vinod Kambli Video Viral : विनोद कांबळींना वृद्धाश्रमात का ठेवलं? हॉस्पिटलकडून व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कांबळींच्या पत्नीची नाराजी! कारणही सांगितलं
विनोद कांबळींना वृद्धाश्रमात का ठेवलं? हॉस्पिटलकडून व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कांबळींच्या पत्नीची नाराजी! कारणही सांगितलं
ठाण्यातील युट्युब भाईला महिलांकडून पोलीस ठाण्यातच मारहाण; पोलिसांसमोरच घडला प्रकार
ठाण्यातील युट्युब भाईला महिलांकडून पोलीस ठाण्यातच मारहाण; पोलिसांसमोरच घडला प्रकार
Jalgaon Accident: वाहनाने बाजूने कट मारताच दुचाकी कठड्याला धडकली; जळगावात पुलावरून खाली पडून ज्योतिषाचा मृत्यू, मुलगी थोडक्यात बचावली
वाहनाने बाजूने कट मारताच दुचाकी कठड्याला धडकली; जळगावात पुलावरून खाली पडून ज्योतिषाचा मृत्यू, मुलगी थोडक्यात बचावली
Goregaon Toilet Death: रात्री शौचालयात गेले अन् बेशुद्ध पडले; 2 तरुणांच्या मृत्यूमागचं कारण FIR मधून समोर, पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं?
रात्री शौचालयात गेले अन् बेशुद्ध पडले; 2 तरुणांच्या मृत्यूमागचं कारण FIR मधून समोर, पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil: आंदोलनातील सहकाऱ्यांवर धडाधड कारवाई, अंतरवालीतील मंडप काढला, मनोज जरांगे सरकारवर संतापले, म्हणाले....
सहकाऱ्यांवर धडाधड कारवाई, अंतरवालीतील मंडप काढला, मनोज जरांगे सरकारवर संतापले, म्हणाले....
October Heat : सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिटचा चटका; राज्यातील 4 जिल्ह्यांत उष्णतेचा पारा 35 अंशांहून जास्त; हवामान विभागाचा अंदाज काय?
सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिटचा चटका; राज्यातील 4 जिल्ह्यांत उष्णतेचा पारा 35 अंशांहून जास्त; हवामान विभागाचा अंदाज काय?
Sharad Pawar on Merger with NDA: आपण कुठेही आणि कुणासोबतही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या; शरद पवारांची मोठी घोषणा
आपण कुठेही आणि कुणासोबतही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या; शरद पवारांची मोठी घोषणा
Embed widget