एक्स्प्लोर

हिंदुत्वाच्या मुद्यानंतर पाणी प्रश्नावरही मनसे-भाजप एकत्र, कल्याणमध्ये काढला तहान मोर्चा   

Kalyan News : मनसे (MNS ) आमदार राजू पाटील आणि (BJP) भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज कल्याण डोंबिवली महापालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

Kalyan News : कल्याण ग्रामीण भागातील 27 गावांमध्ये नागरिकांना  मोठ्या प्रमाणात  पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या पाणी समस्येबाबत अनेक वेळा तक्रारी आणि निवेदने देऊनही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे आज मनसे (MNS ) आमदार राजू पाटील आणि भाजप (BJP) आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महापालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चात आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
 
कल्याण पश्चिमेकडील सर्वोदय  मॉलापासून काढण्यात आलेल्या या मोर्चात मनसेचे आमदार राजू पाटील आणि भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळेही सहभागी झाले होते.   शिवाय या मोर्चात मनसे आणि भाजपचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चातील महिलांनी डोक्यावर हंडा कळशी घेतली होती. शिवाय केडीएमसी आणि आयुक्तांच्या निषेधाचे फलक होते. 

दरम्यान, आमदार पाटील आणि चव्हाण यांच्यासह शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी आयुक्तांच्या कार्यालयात गेले होते. मात्र, आयुक्त हजर नसल्यामुळे त्यांनी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्यासमोर संताप व्यक्त केला. आयुक्तांना मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती असताना ते हजर का नाहीत? असा प्रश्न उपस्थित करत आयुक्त केवळ ठाण्यातील नेत्यांना भेटतात का? असा आरोप मनसे आमदार पाटील यांनी उपस्थित केला. लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेणार नसाल तर महापालिकेला कुलूप लावण्याचा इशारा यावेळी पाटील यांनी दिला. 

नवीन गृहसंकुलाचा पाणी पुरवठा बंद करा आणि ते पाणी गोरगरीब जनतेला द्या. महापालिकेकडून पुरविल्या जाणाऱ्या पाण्याच्या टँकरला जीपीएस यंत्रणा बसवा आणि पाणी वितरणाची व्यवस्था तातडीने सुधारण्यात यावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. याबरोबरच 27 गावांमध्ये 200 हून जास्त टँकर पुरवले जातात, त्यामुळे हा भाग दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.  

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा सुरू असताना आजच्या तहान मोर्चात हे दोन्ही पक्ष एकत्रित आल्यामुळे ही युतीची नांदी आहे का? अशी चर्चा होत आहे. यावर बोलताना आमदार रवींद्र चव्हान म्हणाले, "आमच्या नेत्यांनी नागरिकांच्या प्रश्नासाठी एकत्र येण्यास सांगितले आहे. त्यामुळे लोकहितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत."

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Guardian Minister: चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
Mumbai : महारेराचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई महाप्रदेशाबाहेरील बिल्डर्सना होणार मोठा फायदा, नियमात नेमके काय बदल?
महारेराचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई महाप्रदेशाबाहेरील बिल्डर्सना होणार मोठा फायदा, नियमात नेमके काय बदल?
Rajan Salvi : उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 02 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRohit Pawar on Beed Police Station : बीड पोलीस स्टेशनमध्ये अचानक पाच नवे पलंग का मागवले?Maharashtra Cabinet Meeting : शंभर दिवसांचा रोड मॅप, खातेवाटपानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठकTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 02 जानेवारी 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Guardian Minister: चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
Mumbai : महारेराचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई महाप्रदेशाबाहेरील बिल्डर्सना होणार मोठा फायदा, नियमात नेमके काय बदल?
महारेराचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई महाप्रदेशाबाहेरील बिल्डर्सना होणार मोठा फायदा, नियमात नेमके काय बदल?
Rajan Salvi : उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
Santosh Deshmukh Case: बीडमध्ये घडामोडींना वेग, आधी पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग आणले;आता एसआयटीचे प्रमुख तपासाचा चार्ज घेणार
बीडमध्ये घडामोडींना वेग, आधी पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग आणले;आता वाल्मिक कराडच्या नार्को टेस्टची मागणी
धक्कादायक! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, निफाडमध्ये  5 जणांवर गुन्हा दाखल
धक्कादायक! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, निफाडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल
Santosh Deshmukh Case : मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
केंद्राचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना डीएपी खतं परवडणाऱ्या किमतीत मिळणार, सबसीडीसाठी निधी मंजूर, आता एक बॅग मिळणार..
केंद्राचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना डीएपी खतं परवडणाऱ्या किमतीत मिळणार, सबसीडीसाठी निधी मंजूर, आता एक बॅग मिळणार..
Embed widget