एक्स्प्लोर
दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी मनसे पुन्हा आक्रमक
‘येत्या दहा दिवसात कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरातील दुकानांच्या पाट्या मराठी झाल्या नाहीत, तर दुकानांपूर्वी कल्याण कामगार आयुक्तालय फोडू’, असा इशारा मनसेनं दिला आहे.

कल्याण : फेरीवाल्यांपाठोपाठ मनसेनं पुन्हा एकदा मराठी पाट्यांचा मुद्दाही उचलून धरला आहे. त्यामुळे कल्याणमध्येही मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ‘येत्या दहा दिवसात कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरातील दुकानांच्या पाट्या मराठी झाल्या नाहीत, तर दुकानांपूर्वी कल्याण कामगार आयुक्तालय फोडू’, असा इशारा मनसेनं दिला आहे.
शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी आज (सोमवार) कामगार आयुक्तांची भेट घेतली. दुकानांचे परवाने देताना सरकारी अधिकाऱ्यांनी नियमानुसार दुकानांवर मराठी पाट्या लावणं बंधनकारक करावं. मात्र, या बाबी तपासल्या जात नसल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.
शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी आज (सोमवार) कामगार आयुक्तांची भेट घेतली. दुकानांचे परवाने देताना सरकारी अधिकाऱ्यांनी नियमानुसार दुकानांवर मराठी पाट्या लावणं बंधनकारक करावं. मात्र, या बाबी तपासल्या जात नसल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग























