एक्स्प्लोर
Advertisement
उद्या मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) जाहीर करण्यात आलेल्या मुंबईतील विविध गृहप्रकल्पांतील 1 हजार 384 सदनिकांची संगणकीय सोडत उद्या (रविवारी) काढण्यात येणार आहे.
मुंबई : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) जाहीर करण्यात आलेल्या मुंबईतील विविध गृहप्रकल्पांतील 1 हजार 384 सदनिकांची संगणकीय सोडत उद्या (रविवारी) काढण्यात येणार आहे. या सोडतीकरीता विक्रमी 1 लाख 64 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. उद्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनाच्या प्रांगणात सकाळी 10 वाजता या अर्जांची संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.
म्हाडाच्या संकेतस्थळावरून वेबकास्टिंगद्वारे या सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. वेबकास्टिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण पाहण्याकरीता http://mhada.ucast.in या संकेतस्थळावर लॉग इन करावे. सोडत कार्यक्रम सुरू होण्यापुर्वी करण्यात येणाऱ्या तयारीचेदेखील थेट प्रक्षेपण सकाळी साडेसात वाजल्यापासून संकेतस्थळावरून करण्यात येणार आहे. तसेच म्हाडा मुख्यालयाच्या आवारातील मोकळ्या पटांगणात अर्जदारांना निकाल पाहण्यासाठी मंडप उभारण्यात आला आहे. तेथे व्यासपीठावर होणाऱ्या संगणकीय सोडतीचे प्रक्षेपण पाहता येईल. त्याकरीता म्हाडा भवनाच्या प्रांगणातील मंडपात पाच मोठ्या आकाराचे एलईडी स्क्रीन्सदेखील लावण्यात आले आहेत.
म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या हस्ते सोडत काढण्यात येणार आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे, मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती मधु चव्हाण, मुंबई इमारत दुरूस्त्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, मुंबई झोपडपटटी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा यावेळी उपस्थित राहणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
राजकारण
जॅाब माझा
Advertisement