एक्स्प्लोर

मोठी बातमी! मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज; 2030 घरांसाठी म्हाडाची नवीन लॉटरी जाहीर

Mhada lottery 2024 Mumbai : म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांच्या हस्ते उद्या होणार 'गो लाईव्ह'  

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक (MHADA) असलेल्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड इ. गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला 9 ऑगस्ट, 2024 रोजी दुपारी 12 वाजेपासून प्रारंभ होणार आहे. या सोडतीची जाहिरात दि. 8 ऑगस्ट, 2024 रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रांत तसेच म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून सदनिका सोडतीबाबत माहिती देणारी पुस्तिका या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.         

सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांच्या शुभहस्ते शुक्रवार, 9 ऑगस्ट रोजी 'गो लाईव्ह' समारंभाद्वारे प्रारंभ केला जाणार आहे. यानंतर सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची लिंक मंडळाद्वारे दुपारी 12 वाजेपासून उपलब्ध राहील. तसेच नोंदणीकृत अर्जदार देखील ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक 04 सप्टेंबर, 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. तसेच ऑनलाईन अनामत रकमेची स्विकृती दिनांक 4 सप्टेंबर, 2024 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत केली जाणार आहे. सोडतीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी दिनांक 9 सप्टेंबर, 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे व हरकती दाखल करण्यासाठी दिनांक 9 सप्टेंबर, 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक 11 सप्टेंबर, 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत केली जाणार आहे. प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत दिनांक 13 सप्टेंबर, 2024 रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात येणार असून सोडतीचे ठिकाण मंडळातर्फे लवकरच जाहीर केले जाईल. 

मुंबई मंडळाच्या सन 2024 च्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (Economically Weaker Section) 359 सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी (Lower Income Group) 627 सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी (Middle Income Group) 768 सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी (Higher Income Group) २७६ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडाच्या मुंबई मंडळाने बांधलेल्या 1327 सदनिका, विकास नियंत्रण नियमावली 33 (5), 33 (7) व 58 अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा (Housing Stock) म्हणून म्हाडाला प्राप्त 370 सदनिका (नवीन व मागील सोडतीतील सदनिका) व मागील सोडतीतील विविध वसाहतीतील विखुरलेल्या 333 सदनिकांचा समावेश आहे. म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड (android)अथवा आयओएस (ios) या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमवर अनुक्रमे गूगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरमध्ये  Mhada Housing Lottery System या नावे मोबाइल अॅप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच अर्जदारांच्या सोयीकरिता  https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील अर्ज नोंदणी, अर्ज भरणा व पेमेंट प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, ध्वनीचित्रफिती आणि हेल्प फाईल या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. या सोडतीमध्ये समाविष्ट होण्याकरिता अत्यल्प उत्पन्न गटासाठी रुपये सहा लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. अल्प उत्पन्न गटासाठी रुपये नऊ लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी रुपये बारा लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. उच्च उत्पन्न गटासाठी रुपये बारा लाखांहून अधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणार्‍यांचा समावेश असणार असून या गटासाठी कमाल मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.  मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.         

सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास मुंबई मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणूकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात येत आहे.

हेही वाचा

Video : नेता काय तुझा बाप आहे का?, तुझा बाप...; सोलापुरातून मराठा नेत्यांवरच मनोज जरांगेंचा हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Sambhajiraje chhatrapati: ... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde On Sambhajiraje Chhatrapati :  उशीरा का होईना राजेंना शेतकरी समजले : धनंजय मुंडेAamir Khan च्या 'या' फ्लॉफ चित्रपटाचे चाहते आहेत Lord of the Rings चे 'हे' कलाकार?Lord of the Rings च्या कोणत्या कलाकाराने Priyanka Chopra सोबत केलं काम?Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी दिले राज्यात तिसऱ्या आघाडीचे संकेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Sambhajiraje chhatrapati: ... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
नेरळ तिहेरी हत्याकांडात भाऊ, वहिनी आणि मित्राला अटक;  दृश्यम चित्रपट, क्राईम पेट्रोल मालिका पाहून रचला कट
नेरळ तिहेरी हत्याकांडात भाऊ, वहिनी आणि मित्राला अटक;  दृश्यम चित्रपट, क्राईम पेट्रोल मालिका पाहून रचला कट
स्कॉर्पिओला टक्कर, हुंडईची अल्काझार SUV लाँच; 9 रंगात, शानदार रुबाबात
स्कॉर्पिओला टक्कर, हुंडईची अल्काझार SUV लाँच; 9 रंगात, शानदार रुबाबात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 सप्टेंबर 2024 | सोमवार
धक्कादायक... नाशिकच्या खासगी रुग्णालयात आढळली गर्भपाताची औषधं, अवैध पद्धतीने सुरु होता वैद्यकीय व्यवसाय
धक्कादायक... नाशिकच्या खासगी रुग्णालयात आढळली गर्भपाताची औषधं, अवैध पद्धतीने सुरु होता वैद्यकीय व्यवसाय
Embed widget