एक्स्प्लोर
Advertisement
म्हाडा लॉटरी: अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
म्हाडा मुंबई मंडळ सदनिका सोडतीसाठी अर्ज सादर करण्याकरिता 24 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
मुंबई: म्हाडाने घरांच्या लॉटरीचे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.
म्हाडा मुंबई मंडळ सदनिका सोडतीसाठी अर्ज सादर करण्याकरिता 24 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
ऑनलाईन अर्जासाठी नोंदणी 23 ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहे. तर ऑनलाईन पेमेंट स्वीकृती 26 ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहे.
म्हाडाच्या 819 सदनिकांची सोडत निघणार आहे. त्यासाठी अद्याप अर्ज भरला नसेल तर 23 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करु शकता.
महत्त्वाच्या तारखा
*ऑनलाईन अर्ज नोंदणीची शेवटची तारीख
पूर्वी – 21/10/2017 होती ती आता 23/10/2017 (रात्री 11.59 वा पर्यंत) करण्यात आली आहे.
*ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख
पूर्वी 22/10/2017 होती ती आता 24/10/2017 (रात्री 11.59 वा पर्यंत) करण्यात आली आहे.
*RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी चलन निर्मितीची अंतिम दिनांक
पूर्वी 23/10/2017 होती ती आता 25/10/2017 (रात्री 11.59 वा पर्यंत) करण्यात आली आहे.
*ऑनलाईन पेमेंट स्विकृती अंतिम दिनांक
पूर्वी 24/10/2017 होती ती आता 26/10/2017 (रात्री 11.59 वा पर्यंत) करण्यात आली आहे.
* RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी अंतिम दिनांक
पूर्वी 24/10/2017 होती ती आता 26/10/2017 (बँकांच्या वेळेत) करण्यात आली आहे.
म्हाडा लॉटरी
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबई विभागातील विविध वसाहतीतील 819 घरांसाठी ही लॉटरी असेल. 10 नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात संगणकीय सोडत काढण्यात येईल.
सदर सोडतीकरिता जाहिरात शुक्रवार, दि. 15 सप्टेंबर 2017 रोजी विविध वर्तमानपत्रांमध्ये आणि म्हाडाच्या https://mhada.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली.
कुठे किती घरं?
अत्यल्प गट 8 घरं : प्रतीक्षा नगर- सायन, मानखुर्द, चांदिवली, मागाठाणे-बोरिवली
अल्प उत्पन्न गट 192 घरं: कन्नमवार नगर विक्रोळी, चारकोप कांदिवली (पश्चिम), सिद्धार्थ नगर – गोरेगाव (पश्चिम), चांदिवली, मानखुर्द, मालवणी मालाड
मध्यम उत्पन्न गट 281 घरं: प्रतीक्षा नगर- सायन, सिद्धार्थ नगर – गोरेगाव (पश्चिम), उन्नत नगर- गोरेगाव (पश्चिम), चारकोप कांदिवली (पश्चिम), गायकवाड नगर- मालवणी मालाड
उच्च उत्पन्न गट 338 घरं: लोअर परेल – मुंबई, तुंगा – पवई, चारकोप कांदिवली (पश्चिम), शिंपोली – कांदिवली (पश्चिम)
कोणत्या गटासाठी किती घरं?
- अत्यल्प उत्पन्न गट – 8 घरं
- अल्प उत्पन्न गट – 192 घरं
- मध्यम उत्पन्न गट – 281 घरं
- उच्च उत्पन्न गट – 338 घरं
- एकूण – 819
- अत्यल्प उत्पन्न गट – 15 हजार 336 रुपये
- अल्प उत्पन्न गट – 25 हजार 336 रुपये
- मध्यम उत्पन्न गट – 50 हजार 336 रुपये
- उच्च उत्पन्न गट – 75 हजार 336 रुपये
- अत्यल्प उत्पन्न गट – 25,000
- अल्प उत्पन्न गट – 25001 ते 50000 रुपये
- मध्यम उत्पन्न गट – 50,001 ते 75,000 रुपये
- उच्च उत्पन्न गट – 75,001 पेक्षा जास्त
- अत्यल्प उत्पन्न गट : 15 ते 20 लाख रुपयांदरम्यान
- अल्प उत्पन्न गट : 23 ते 35 लाख रुपयांदरम्यान
- मध्यम उत्पन्न गट : 36 लाख ते 56 लाख रुपये
- उच्च उत्पन्न गट : 72 लाख ते 1 कोटी 96 लाख
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अमरावती
ठाणे
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement