एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई महापौरपदाच्या निवडीसाठी तारखेचा घोळ
मुंबई : मुंबईच्या महापौरपदाच्या निवडीसाठी तारखेचा घोळ सुरु झाला आहे. प्रत्यक्षात निवडणूक 9 मार्च रोजी घेणं अपेक्षित आहे. मात्र, आयुक्तांनी अचानक सुचवलेल्या बदलांमुळे महापौरपदाची निवडणूक एक दिवस आधीच म्हणजे 8 मार्चला होण्याची शक्यता आहे.
भाजप 8 मार्चसाठी आग्रही आहे तर शिवसेनेकडून 9 तारखेला निवडणूक घेण्याची मागणी केली जात आहे.
खरंतर 8 मार्चला मुंबई महापालिकेची मुदत संपत आहे. त्यामुळे 9 मार्चला नवा महापौर बसवणं अपेक्षित आहे. मात्र महापालिका आयुक्त एक दिवस आधीच म्हणजे 8 मार्चला महापौरपदाची निवडणूक घेण्याची शक्यता आहे.
महापौर पदाची निवडणूक 8 मार्चलाच घेण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. मात्र, तांत्रिकदृष्ट्या 8 मार्चला निवडणूक झाल्यास मोठा प्रशासकीय पेच निर्माण होईल.
2012 मध्ये निवडून आलेल्या जुन्या महापालिका सभागृह सदस्यांची मुदत ही 8 मार्चच्या रात्री 12 वाजेपर्यंत आहे. जर 8 मार्चलाच निवडणूक घेतली तर नव्या नगरसेवकांसह जुने नगरसेवकही मतदानाचे दावेदार ठरतील.
अशा परिस्थितीत 9 तारखेला निवडणूक झाल्यास मोठा पेच निर्माण होणार असल्याने प्रशासनाने कोणाच्याही दबावाखाली न येता नियमाप्रमाणे 9 मार्चला महापौरपदाची निवडणूक घ्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement