एक्स्प्लोर
मुंबईत आज तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक
मुंबई : मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारीही ट्रेनने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना काहीसा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
पश्चिम रेल्वे :
पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे :
मेगाब्लॉकची वेळ : मध्य रेल्वेच्या मुंलुड ते माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 वाजेपर्यत दुरुस्तीची कामे चालणार आहेत.
परिणाम : मुंलुड ते माटुंगा दरम्यान नाहूर, कांजुरमार्ग आणि विद्याविहार स्थानकात लोकल गाड्या थांबणार नाहीत. डाउन जलद मार्गावरील लोकल सकाळी 10.08 ते दुपारी 2.42 या वेळेत 20 मिनिटे, तर अप जलद मार्गावरील लोकल सकाळी 11.22 ते दुपारी 3.28 या वेळेत 15 मिनिटे उशिराने धावतील.
हार्बर रेल्वे :
मेगाब्लॉकची वेळ : हार्बरवर कुर्ला ते मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाऊनवर दुरुस्तीसाठी सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यत ब्लॉक चालणार आहे.
परिणाम : कुर्ला ते मानखुर्द दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सकाळी 10.20 ते दुपारी 3.48 वाजेपर्यत पूर्णपणे बंद राहणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement