एक्स्प्लोर
मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक
मुंबई : मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गांवर आज सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेमार्गावरील हार्बर लाईन्सच्या विस्तारीकरणासाठी सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मेन लाइनवरील कल्याण ते ठाणे दरम्यान अप स्लो मार्गावर स. 11.15 ते दुपारी 4.15 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे चालणार आहेत. या ब्लॉकदरम्यान कल्याणवरुन स. 10.47 ते दुपारी 4.15 पर्यंत स्लो आणि सेमी फास्ट लोकल अप फास्ट मार्गावरुन चालविल्या जातील.
या कालावधीत ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा या स्थानकांवर अप स्लो लोकल थांबणार नाहीत. या स्थानकांवरील प्रवाशांना ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण मार्गे प्रवास करता येईल.
मेगाब्लॉकच्या काळात स. 10.08 ते दुपारी 2.42 वाजेपर्यंत सीएसटीहून सुटणाऱ्या सर्व डाऊन मार्गावरील लोकलना दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला येथे थांबे देण्यात आले आहेत.
तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमध्ये सीएसटीहून पनवेल/ बेलापूर/ वाशीसाठी सुटणाऱ्या अप आणि डाऊन लोकल सकाळी 10.35 ते दुपारी 3.48 वेळेत बंद राहतील. हार्बरच्या प्रवाशांना सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलमध्ये जादा फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
हार्बर मार्गाच्या विस्तारासाठी 30 एप्रिल रोजी विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत पाश्चिम रेल्वे मार्गावरील जोगेश्वरी स्थानकापासून डाऊन मार्गावर 9 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
या ब्लॉकदरम्यान धीम्या मार्गावरील अंधेरी व गोरेगाव या लोकलसेवा मध्य डाऊनवरील जलद मार्गावर चालविण्यात येणार आहे. या लोकल राम मंदिर स्थानकावर थांबणार नाही, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement