एक्स्प्लोर
आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवरील कल्याण ते ठाणे अप फास्ट, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी/वांद्रे-अंधेरी, सीएसएमटी ते चुनाभट्टी मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेमार्गावरील हार्बरच्या अखत्यारीत अंधेरी ते माहीमपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
मुंबई : मध्य रेल्वेवरील कल्याण ते ठाणे अप फास्ट, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी/वांद्रे-अंधेरी, सीएसएमटी ते चुनाभट्टी मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेमार्गावरील हार्बरच्या अखत्यारीत अंधेरी ते माहीमपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
मध्य रेल्वेवरील कल्याण ते ठाणे अप फास्ट मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने, मेगाब्लॉक काळात कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद मार्गाच्या फेऱ्या अप स्लो मार्गावर चालवण्यात येतील. ठाणे आणि सीएसएमटीपर्यंत लोकल नियमित स्वरुपात अप फास्ट मार्गावर चालवण्यात येतील. या लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकावर थांबतील.
तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे डाऊन मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/ वांद्रे-सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 लोकल सेवा बंद राहणार आहे. यामुळे सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेल मार्गावर सकाळी 11.34 ते दुपारी 4.47 पर्यंत आणि सीएसएमटी ते वांद्रे/अंधेरीपर्यंत सुटणाऱ्या सर्व सेवा या काळात बंद राहणार आहेत. प्रवाशांच्या सोईसाठी पनवेल-कुर्ला (प्लॅटफार्म क्र. ८) विशेष सेवा चालविण्यात येणार आहे.
दुसरीकडे पश्चिम रेल्वे मार्गावरही आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील हार्बरच्या अखत्यारीत अंधेरी ते माहीम मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 पर्यंत मेगाब्लॉक चालणार आहे. त्यामुळे या काळात हार्बर मार्गावरुन अंधेरीकडे जाणाऱ्या सर्व लोकल सेवा बंद असतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement