एक्स्प्लोर
Advertisement
'माथेरानची राणी' लवकरच ट्रॅकवर, मिनी ट्रेनची चाचणी यशस्वी
मिनी ट्रेन सुरु होण्याची चिन्हं दिसू लागल्याने नेरळकरांसह इथे येणाऱ्या सर्वच पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
नेरळ (रायगड) : 'माथेरानची राणी' म्हणून जिला ओळखलं जातं, ती मिनी ट्रेन लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. कारण मिनी ट्रेनची चाचणी यशस्वी झाली आहे. नेरळ स्टेशनहून निघाल्यानंतर साडेतीन तासांचा प्रवास करुन मिनी ट्रेन माथेरानमध्ये दाखल झाली.
जवळपास मे 2016 पासून बंद असलेली ही मिनी ट्रेन उद्यापासून किंवा येत्या काही दिवसात सुरु होण्याची शक्यता आहे. नेरळ स्टेशनपासून माथेरानपर्यंत यशस्वी चाचणी घेण्यात आली. दोन इंजिन आणि पाच इंजिनसह मिनी ट्रेनची चाचणी झाली.
बच्चे कंपनीची आवडती झुकझुक गाडी बेमुदत काळासाठी बंद होती. त्यामुळे बच्चेकंपनीसह सर्वच पर्यटकांचा हिरमोड होत होता. मात्र आता ट्रायल सुरु झाल्याने मिनी ट्रेन पुन्हा सुरु होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
मिनी ट्रेन सुरु होण्याची चिन्हं दिसू लागल्याने नेरळकरांसह इथे येणाऱ्या सर्वच पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
दरम्यान, माथेरानच्या मिनी ट्रेनला अमन लॉजजवळ रुळावरुन घसरुन अपघात झाला होता. 1 आणि 8 मे अशा दोन वेळा ट्रेन रुळावरुन घसरली होती. त्यानंतर ट्रेन बेमुदत बंद करण्यात आली होती. अनेकदा ट्रेन सुरु करण्याच्या घोषणा करण्यात आल्या. त्यानंतर आजपर्यंत ट्रेन बंदच होती. आज या ट्रेनच्या चाचणीला सुरुवात झाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement