एक्स्प्लोर
Advertisement
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार : मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांसोबत ज्यांची बैठक होत आहे, त्यांच्याशी आमचा कोणताही संबंध नाही, असं मराठा क्रांती मोर्चानं स्पष्ट केलं आहे.
मुंबई : मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आंदोलकांसोबत चर्चा केली. नारायण राणे आणि काँग्रेस आमदार नितेश राणेसुद्धा या बैठकीला उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी ज्यांच्यासोबत बैठक घेतली, ते नेमके कोणते आंदोलक होते, याबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली. सुरक्षेसाठी त्यांची नावं उघड न केल्याचं बोललं जात आहे.
LIVE UPDATE
मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, मराठा संघटनांनी शांततेच्या मार्गाने सहकार्य करावं : मुख्यमंत्री मेगाभरतीमध्ये मराठा समाजातील तरुणांवर अन्याय होऊ देणार नाही : मुख्यमंत्री मागासवर्गीय आयोगाचा अहवाल एका महिन्याच्या आत देणार : मुख्यमंत्री मराठा आंदोलकांनी शांतता राखावी : मुख्यमंत्री मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतो, पोलिसांवर हल्ले करणाऱ्या गुन्हेगारांना मात्र अभय नाही : मुख्यमंत्री दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत ज्यांची बैठक झाली, त्यांच्याशी आमचा कोणताही संबंध नाही, असं मराठा क्रांती मोर्चानं स्पष्ट केलं. आधीच मागण्या दिलेल्या असताना चर्चेचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चानं घेतली आहे. तसा ठरावही आज लातूरमध्ये झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत मंजूर करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे महत्वाची गोष्ट म्हणजे या बैठकीत काय चर्चा होते, याची माहिती सर्व मराठा आंदोलकांना व्हावी, यासाठी बैठकीचं थेट प्रक्षेपण करण्याची मागणीही नारायण राणे यांनी केली होती. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर ही चर्चा झाली असून बैठकीतील तपशिलाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. सोलापूर बंदची हाक सकल मराठा समाजाच्या बैठकीत उद्या (सोमवारी) सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी संपूर्ण सोलापूर जिल्हा बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं सोलापुरात जागरण गोंधळ आयोजित करण्यात आला होता. रुपाभवानी मंदिरात हा गोंधळ पार पडला. रुपाभवानी मातेची पूजा करुन या गोंधळाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनीही हजेरी लावली होती. मराठा समाजाने राज्य शासनाला सद्बुद्धी देण्यासाठी यावेळी रुपाभवानीला साकडं घालण्यात आलं. पुण्यात मोर्चा पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मराठा आंदोलक कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. परळीत आंदोलनाचा बारावा दिवस बीड जिल्ह्यातल्या परळीत सुरु असलेल्या ठोक आंदोलनाचा आज बारावा दिवस आहे. सरकारच्या वतीनं विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकरांनी आंदोलकांची भेट घेऊन सरकारची बाजू मांडली. यावर, आम्ही मराठा मोर्चाच्या समन्वयकांशी आणि आंदोलकांशी चर्चा करु, त्यानंतर ठिय्या मागे घ्यायचा की नाही याचा निर्णय घेऊ, अशी भूमिका आंदोलनातील आबा पाटील यांनी मांडली आहे. शिवसेनेची उद्या बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी सर्व आमदारांची बैठक बोलवली आहे. उद्या (सोमवारी) दुपारी बारा वाजता मातोश्रीवर बैठक आयोजित करण्यात आली आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement