एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मंजुळा शेट्ये प्रकरणाचा चौकशी अहवाल अंतिम टप्प्यात!
मंजुळा शेट्येचा सीलबंद शवविच्छेदन अहवालही हायकोर्टासमोर सादर करण्यात आला.
मुंबई : भायखळा जेलमधील वॉर्डन मंजुळा शेट्येच्या मृत्यू प्रकरणाचा तपास हा अंतिम टप्यात आला आहे. येत्या 20 दिवसांत या प्रकरणात आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहीती क्राईम ब्रांचने मुंबई हायकोर्टात दिली.
मंजुळा शेट्येचा सीलबंद शवविच्छेदन अहवालही हायकोर्टासमोर सादर करण्यात आला. तसेच यासंदर्भात स्वतंत्र चौकशी समितीचा अंतिम अहवालही लवकरच सादर करणार असल्याचं राज्य सरकारच्यावतीने सांगण्यात आलं.
मंजुळा ही बाथरूममध्ये असताना तिला चक्कर आली आणि त्यातच पाय घसरून ती पडली, ज्याने तिची शुद्ध हरपली आणि अशातच तिचा मृत्यू झाला, असा दावा या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मुंबई हायकोर्टात केला, त्याचबरोबर मंजुळाच्या अंगावरील खुणा याही पाय घसरून पडल्याच्या कारणाने झाल्याचंही हायकोर्टात याआधीच सांगण्यात आलं.
ज्या डॉ. विश्वेश गोटे यांनी पंचनामा केला त्यांचीही चौकशी सुरू असल्याचं हायकोर्टाला सांगण्यात आलं. जेल प्रशासन आणि क्राईम ब्रांचच्या तपासावर समाधानी असल्याचं सांगत हायकोर्टाने या प्रकरणाची सुनावणी 4 आठवड्यांकरता तहकूब केली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
भायखळा जेलमधील मंजुळे शेट्ये या महिलेचा शनिवार (24 जून 2017) मृत्यू झाला होता. अधिकाऱ्याच्या मारहाणीनंतर मंजुळे शेट्येचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
Exclusive : मंजुळा शेट्येवर अनन्वित अत्याचार आणि मारहाण!
महिला कैद्याच्या हत्येपूर्वी तिच्यावर सहा महिला अधिकाऱ्यांकडून लैगिंक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.मंजुळा शेट्ये हत्या: स्वाती साठेंचा व्हॉट्सअॅप मेसेज, आरोपींनाच पाठिंबा
मिळालेल्या माहितीनुसार, मंजुळा शेट्ये हिच्याकडून दोन अंडी व पाच पावांचा हिशेब लागत नसल्याचे निमित्त करुन तिला मारहाण करण्यात आली. एका बॅरेकमध्ये मंजुळाला नग्न करुन लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच तिचा लैंगिक छळही करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement