एक्स्प्लोर
CCTV : क्रूरपणा... कुत्र्याला कारखाली चिरडलं!
कारचालकाचा क्रूरपणा सिद्ध करणारी ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
ठाणे : क्रूरपणाची हद्द पार करणारी घटना ठाण्यात घडली. एका व्यक्तीने भटक्या कुत्र्याच्या अंगावरुन गाडी चालवून त्याला ठार केले आहे. ही घटना निवारा पालस्प्रिंग सोसायटी या ठिकाणी घडली.
24 ऑक्टोबरला घडलेल्या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसते आहे की, गिरीश संत आपल्या चारचाकीमधून पुढे येत असताना, सोसायटीमध्ये बसलेल्या एका कुत्र्यावर त्याने गाडी चढवली.
धक्कादायक म्हणजे, गाडीखाली कुत्रा चिरडला गेल्यानंतरही गाडीच्या ड्रायव्हरने खूप वेळ गाडी तशीच ठेवली. क्रूरपणाची हद्द म्हणजे, त्याने कुत्र्यावरुन गाडी पुढे नेल्यानंतर पुन्हा मागे घेतली आणि तडफडत असलेल्या कुत्र्यावर चढवली.
सोसायटीमध्येच त्या ठिकाणी हजर असलेली दुसरी व्यक्ती ड्रायव्हरला गाडीखाली कुत्रा असल्याचे सांगू पाहत होती. मात्र त्याच्याकडे ड्रायव्हरने पूर्णपणे दुर्लक्ष केले.
क्रूरपणा सिद्ध करणारी ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. त्यानंतर प्राणीप्रेमी संजीव दिघे यांनी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकाराविरोधात तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अजून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
बातमीचा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement