एक्स्प्लोर

Majha Maharashtra Majha Vision 2020 | शटडाऊन, लॉकडाऊन नको; आता सगळं सुरु करा : राज ठाकरे

लॉकडाऊनमुळे मानसिक विंवचनेत असलेल्या लोकांना बाहेर काढण्याची जबाबदार सरकारची आहे. त्यामुळे सर्व पूर्ववत करा, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात ते बोलत होते.

मुंबई : "सरकारकडून लावलेले निर्बंध, टेलिव्हिजनवरील बातम्या आणि व्हॉट्सअॅपवरचे मेसेज यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहेत. काळजी घेणं गरजेचं आहे पण घाबरुन घरात बसणं योग्य नाही. लोकांना मानसिक विवंचनेतून बाहेर काढायला हवं. त्यामुळे सगळ्या गोष्टी पूर्ववत करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. काळजी घ्या, पण शटडाऊन आणि लॉकडाऊन नको, असंही ते म्हणाले. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात ते बोलत होते.

केंद्र सरकारने अनलॉक- 3 च्या गाईडलाईन जारी केल्यानंतर राज्य सरकारनेही गाईडलाईन जारी केल्या आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.

Unlock-3 | मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स 5 ऑगस्टपासून सुरु होणार, राज्य सरकारच्या गाईडलाईन जारी

नव्या गाईडलाईनमध्ये महत्त्वाची बाब म्हणजे मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स 5 ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत. मात्र सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेदरम्यान मॉल्स आणि शॉपिंग कॉम्पेक्स सुरु राहणार आहेत. मॉल्समधील थिएटर मात्र सुरु होणार नाहीत. फूड मॉलमधील हॉटेल्स फक्त घरपोच जेवण देऊ शकतील.

Majha Maharashtra Majha Vision 2020 | उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार दिसलाच नाही : राज ठाकरे

पुनश्च हरी ओमबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "लोकांना मानसिक विंवचनेतून बाहेर काढण्याची जबाबादारी सरकारची आहे. त्यासाठी काही गोष्टी सुरु करणं आवश्यक आहे. काळजी घेतली पाहिजे, सतत शटडाऊन आणि लॉकडाऊन बंद केलं पाहिजे. आज उद्योग बंद आहेत, दुकानं बंद आहेत, सगळे घरात बसून आहेत, नोकरी टिकेल की नाही याचीही खात्री नाही. अनेकांना नोकरीवरुन काढलंय. यावर सरकार काय विचार करतंय, या गोष्टी सरकारने सांगितल्या पाहिजे. त्यामुळे सगळं चालू करा असं माझं मत आहे."

माझा महाराष्ट्र माझं व्हिजन विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच राज्याला कोरोनाने विळखा घातला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. अशातच आता या जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सरकारचं व्हिजन काय आहे? त्याचबरोबर कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिणामांचा सरकार कसा सामना करणार आहे? तसेच सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम होत आहे. पहिल्या सत्रात राज ठाकरे यांनी आपलं व्हिजन मांडलं.

Majha Maharashtra Majha Vision | Raj Thackeray Vision | नव्या महाराष्ट्रासाठी राज ठाकरे यांचं व्हिजन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget