(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shinde-Kirtikar Meet : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार गजानन कीर्तिकर यांची भेट, कीर्तिकर शिंदे गटात सामील होणार?
Eknath Shinde Meets Gajanan Kirtikar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांची भेट घेतली. गजानन कीर्तिकर हे सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत.
Eknath Shinde Meets Gajanan Kirtikar : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला (Shiv Sena) एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. आधी 40 आमदारांना आपल्या सोबत घेतल्यानंतर लोकसभेच्या 12 खासदारही शिंदे गटात (Shinde Group) सामील झाले आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांची भेट घेतली. गजानन कीर्तिकर हे सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत आहेत. त्यामुळे आता गजानन कीर्तिकर देखील शिंदे गटात सामील होणार का असा प्रश्न विचारला जात आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गजानन कीर्तिकर यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. शिवसेनेचे उत्तर-पश्चिम मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर हे काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे घरीच आहेत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे त्यांच्या भेटीला गेले. सगळ्यांच्या उपस्थित दोघांमध्ये चर्चा झाली. कीर्तिकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. दरम्यान ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं जात आहे.
12 खासदार शिंदे गटात
दरम्यान शिवसेनेचे लोकसभेचे 12 खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. तीन दिवसांपूर्वी या बंडखोर खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि शिवसेनेच्या स्वतंत्र गटाची मागणी केली. लोकसभा अध्यक्षांना गटनेता बदलण्याच्या मागणीचं पत्र दिलं. त्यानंतर शिंदे आणि 12 खासदारांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिंदेंनी 12 खासदारांच्या भूमिकेचं स्वागत केलं शिवाय भावना गवळींचा शिवसेनेच्या मुख्य प्रतोद असा उल्लेख केला. लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात खासदार राहुल शेवाळेंचा गटनेता आणि भावना गवळींचा मुख्य प्रतोद असा उल्लेख आहे
शिंदे गटात सामील झाले खासदार कोणते?
1. राहुल शेवाळे
2. भावना गवळी
3. कृपाल तुमने
4. हेमंत गोडसे
5. सदाशिव लोखंडे
6. प्रतापराव जाधव
7. धर्यशिल माने
8. श्रीकांत शिंदे
9. हेमंत पाटील
10. राजेंद्र गावित
11. संजय मंडलिक
12. श्रीरंग बारणे
संबंधित बातम्या