एक्स्प्लोर

पॉक्सो, विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी डीसीपींची परवानगी लागणार, मुंबई पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

Mumbai Pocso Case : मुंबईत पॉक्सो (Pocso)  किंवा विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करण्यापूर्वी डीसीपी दर्जाच्या (DCP)  अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागणार आहे

Mumbai Pocso Case : मुंबई पोलीस आयुक्तांनी  पॉक्सो संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे पॉक्सो (Pocso)  किंवा विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करण्यापूर्वी डीसीपी दर्जाच्या (DCP)  अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंनी  (Sanjay Pandey) हा निर्णय घेतला आहे 

मुंबई पोलीस आयुक्त  संजय पांडे यांनी नुकताच एक आदेश जारी करून सांगितले की, जुन्या वादातून, मालमत्तेच्या वादातून किंवा अन्य कोणत्याही वैमनस्यातून पोलिस ठाण्यात पॉक्सो किंवा विनयभंगाच्या तक्रारी दाखल होत असल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत अनेकवेळा आरोपी निर्दोष ठरतो, मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि त्याची बदनामीही होते.प्रथम एसीपी प्रथम अशा कोणत्याही तक्रारीची चौकशी करतील आणि नंतर अंतिम आदेश डीसीपी देतील, त्यानंतर गुन्हा दाखल करा.

POCSO चा होणाऱ्या गैरवापारामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. जुनी भांडण, प्रॉपर्टीचे वाद, वैमनस्य अशा अनेक कारणांमुळे पोलिस स्थानकात खोट्या तक्रारी झाल्या आहेत. नंतर चौकशीनंतर  आरोपी  निर्दोषी आढळतो परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. अशा प्रकरणात आरोपीची मोठी बदनामी झालेली असते.  संजय पांडे आदेश जारी करताना म्हणाले की, या पुढे पॉक्सो किंवा विनयभंगाची तक्रार आल्यास अगोदर ACP कडे जाईल त्यानंतर  DCP दर्जाचा अधिकारी अंतिम निर्णय देतील, पॉक्सो कायदा 2012 साली आला होता. 

 पॉक्सो कायदा (POCSO ACT) म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा. बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी भारत सरकारने 2012 साली तयार केलेला कायदा आहे. लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा. 

संबंधित बातम्या :

Mumba Police : पोलीस शिपाई ते जमादार यांना आठ तास ड्युटी, मुंबई पोलीस आयुक्तांचा निर्णय

Mumbai Police : जनतेसोबत संवाद वाढवणार, मुंबई पोलीस स्थापन करणार सिटीजन फोरम समिती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ameet Satam BMC Fund: बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 एप्रिल 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 एप्रिल 2026 | रविवार
गौतम अदानींची मोठी घोषणा, 'या' प्रकल्पात करणार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 143 एकरमध्ये होणार काम
गौतम अदानींची मोठी घोषणा, 'या' प्रकल्पात करणार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 143 एकरमध्ये होणार काम
Mumbai MHADA: देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प, '15 मिनिटांचे शहर' म्हणून नवी ओळख, मोतीलाल नगर पुनर्विकासाचा मास्टरप्लान सादर
देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प, '15 मिनिटांचे शहर' म्हणून नवी ओळख, मोतीलाल नगर पुनर्विकासाचा मास्टरप्लान सादर

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ameet Satam BMC Fund: बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले

Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Bigg Boss Marathi 6 Tanvi Kolte: सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
Ahilyanagar Crime News: 'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
Bhendwal Bhavishyvani 2026: जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
धक्कादायक! सलग दुसऱ्या दिवशी तामिळनाडूत मोठा अपघात, फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, आत्तापर्यंत 16 महिलांसह 23 जणांचा मृत्यू 
धक्कादायक! सलग दुसऱ्या दिवशी तामिळनाडूत मोठा अपघात, फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, आत्तापर्यंत 16 महिलांसह 23 जणांचा मृत्यू 
Embed widget