Mumbai Police : जनतेसोबत संवाद वाढवणार, मुंबई पोलीस स्थापन करणार सिटीजन फोरम समिती
Mumbai Police : जनता आणि पोलिस यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी (ALM) आणि मोहल्ला समिती सदस्यांची एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
![Mumbai Police : जनतेसोबत संवाद वाढवणार, मुंबई पोलीस स्थापन करणार सिटीजन फोरम समिती Maharashtra Mumbai Police will set up Citizen Forum Committee to increase dialogue with the people Mumbai Police : जनतेसोबत संवाद वाढवणार, मुंबई पोलीस स्थापन करणार सिटीजन फोरम समिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/01/d542c698120a85e20df48028763977f7_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी शहरातील प्रत्येक झोन आणि प्रदेशात अॅडव्हान्स्ड लोकॅलिटी मॅनेजमेंट (ALM) आणि मोहल्ला समिती सदस्यांची एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. रविवारी दुपारी फेसबुकवर लाईव्ह आलेले पांडे म्हणाले की, त्यांनी जनता आणि पोलिस यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी (ALM) आणि मोहल्ला समिती सदस्यांची एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
संजय पांडे म्हणाले, मुंबई शहरात दक्षिण, मध्य, पश्चिम, पूर्व आणि उत्तर असे पाच क्षेत्र आहेत. प्रत्येक प्रदेशात सक्रिय गटाचे तीन सदस्य होते. तसेच, संपूर्ण शहरामध्ये 12 झोन आहेत आणि प्रत्येक झोनमध्ये 60 जणांच्या टीममध्ये पाच सदस्य असतील. त्या सर्वांवर वरिष्ठ अधिकारी देखरेख करतील.
पांडे म्हणाले की, यामुळे समाजातील विविध समस्या समोर आणण्यास मदत होईल आणि त्यावर तोडगा काढण्यासही मदत होईल. मुद्दे उचलून धरण्यासाठी आम्हाला रचना हवी आहे. मला आठवतंय की, बेस्टला माझ्या एका पत्रानंतर ही समस्या सुटली होती. अशा अनेक समस्या आहेत ज्यांचा शोध घेतला जाऊ शकतो. आम्ही दर महिन्याला एक बैठक आयोजित करू शकतो जी निवडणूक आणि तणावपूर्ण परिस्थितीत देखील घेतली जाऊ शकते.
मी ज्यावेळी मुंबईत पोलीस आयुक्त म्हणून आलो. त्यामुळे मला महापालिकेच्या रहिवासी संघटनांबद्दल माहिती मिळाली. सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आयोजीत केलेल्या एका कार्यक्रमांत रहिवासी संघटनांबाबतची माहिती मला कळाली. त्यावेळी 20 इमारतींमागे एक रहिवासी संघटना आहेत व त्यांना विशिष्ठ कामे नेमून देण्यात आली आहे. त्यावेळी मी महापालिकेच्या संकेतस्थळावरून या संघटनांचा अभ्यास केला. त्यावेळी मोहल्ला कमिटी व पालिकेच्या रहिवासी संघटनांना एकत्र आणले पाहिजे असा विचार आला.
संबंधित बातम्या :
Sanjay Raut : मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंचं ट्वीट, संजय राऊत म्हणतात...
अवैध धंदेवाले आणि फेरीवाल्यांना संरक्षण देण्याच्या बहाण्याने पैसे उकळणाऱ्यांवर कारवाई करा : मुंबई पोलिस आयुक्त
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)