एक्स्प्लोर

अमित शाह-उद्धव ठाकरेंची भेट झाली, पण विधानपरिषदेत युती नाही

अमित शाह यांच्या ‘मातोश्री’वारीचा आगामी विधानपरिषद निवडणुकीवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मुंबई: देशाचं लक्ष लागलेल्या भाजप अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट अखेर झाली. शिवसेना-भाजपमधील तणाव दूर करण्याचा प्रयत्न या भेटीच्या माध्यमातून करण्यात आला. मात्र अमित शाह यांच्या ‘मातोश्री’वारीचा आगामी विधानपरिषद निवडणुकीवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. विधानपरिषदेच्या 4 जागेवर विशेषतः मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधरमध्ये शिवसेना -  भाजपामध्ये थेट लढत होणार आहे. कोकण पदवीधरची जागा भाजपची असून या ठिकाणी भाजपविरोधात शिवसेनेने उमेदवार दिला आहे. तर मुंबई पदवीधरची जागा शिवसेनेची असून भाजप शिवसेनेविरोधात उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. आज ( 7 जून ) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून, भाजप आज मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या जागेसाठी उमेदवार मैदानात उतरवणार आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 11 जून हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, 25 जूनला मतदान तर 28 जूनला मतमोजणी आहे. तेव्हा अमित शाह - उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर पुढील 4 दिवसांत काय घडामोडी घडतात, विधानपरिषद निवडणूकमध्ये सेना -भाजप हे एकमेकांविरोधात लढणार की युती करणार हे   बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः पालघरच्या सभेत बुधवारच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे काय भूमिका जाहीर करतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. उद्धव ठाकरे आज दुपारी 3 वाजता पालघरमधील शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार.तलासरी कवाडा येथे श्रीनिवास वनगा यांच्या निवासस्थानी उपस्थित राहून, भेटीगाठी घेतील.  यावेळी उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना काय सल्ला देणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निरंजन डावखरे – भाजप नजिब मुल्ला – राष्ट्रवादी काँग्रेस संजय मोरे – शिवसेना मुंबई पदवीधर मतदारसंघातील उमेदवार विलास पोतनीस- शिवसेना अमित महेता - भाजप राजेंद्र कोरडे – शेकाप (काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा) राजू बंडगर - नारायण राणे यांचा स्वाभिमानी पक्ष पुरस्कृत जालिंदर सरोदे – शिक्षक भारती दीपक पवार - अपक्ष मुंबई शिक्षक मतदारसंघ उमेदवार कपिल पाटील – शिक्षक भारती (काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा) अनिल देशमुख - भाजप शिवाजी शेंडगे - शिवसेना नाशिक शिक्षक मतदारसंघ संदीप बेडसे - महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा) शिवसेना – किशोर दराडे (नुकतेच विधानपरिषद निवडणूक जिंकलेले नरेंद्र दराडेंचे बंधू) भाजप –अनिकेत पाटील ( माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांचे चिरंजीव) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे विद्यामन आमदार नाशिक शिक्षक मतदारसंघ : डॉ. अपूर्व हिरे मुंबई शिक्षक मतदारसंघ : कपिल पाटील मुंबई पदवीधर मतदारसंघ : डॉ. दीपक सावंत कोकण पदवीधर मतदारसंघ : निरंजन डावखरे संबंधित बातम्या  शिवसेनेची मुंबई पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी विलास पोतनीसांना   आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा राजीनामा   मुंबईकर पदवीधरांनो, हे जाणून घ्या....  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget