एक्स्प्लोर

Maharashtra Cabinet Meeting : केंद्राच्या UPS च्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन योजना, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 19 मोठे निर्णय

Maharashtra Cabinet Meeting : महाराष्ट्राच्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्राच्या यूपीएसच्या धर्तीवर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. केंद्र सरकारनं काल कॅबिनेट बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी यूनिफाइड पेन्शन योजना लागू केली. ती योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणं सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज दिली जाणार आहे.  गटप्रवर्तकांच्या मानधनात चार हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) :

1)राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात येणार आहे. मार्च 2024 पासून अंमलबावणी सुरु होईल. लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. 

2)राज्यातील जास्तीत- जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार. योजनेची व्याप्ती वाढवली

3)गटप्रवर्तकांच्या मानधनात ४ हजारांची भरीव वाढ

4)ऑलिंपिकवीर स्व. पै.खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देणार

5)थकीत देण्यांसाठी महावितरण कंपनीस कर्जाकरिता शासन हमी

6)पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढणार. पुणे परिसरास सिंचन, पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार

7)नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्प. ७ हजार १५ कोटीस मान्यता. नाशिक, जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा

8)सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी

9)शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० ऑगस्टपर्यंत
 
10)ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ. सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ

11)ठाणे येथील महत्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी #महाप्रित ५ हजार कोटी निधी उभारणार

12) 'बार्टी' च्या 'त्या' ७६३ विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ

13)मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करणार. विविध महामंडळे प्रकल्प राबविणार

14)कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ

15)कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा, सेवाशुल्क माफ

16)चिपळूण, रामटेक, इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात फेरबदल

17)श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना

18)पाचोऱ्यातील सहकारी सूत गिरणीस शासन अर्थसहाय्य

19)सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जमीन

इतर बातम्या : 

Anil Bonde : राफावर दुःख व्यक्त करणाऱ्यांना हिंदूंवरील अत्याचार दिसत नाहीत का? खासदार अनिल बोंडेंचा विरोधकांना सवाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | 10 PM TOP Headlines | 10 PM 06 November 2024 | एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole Speech BKC: आमच्या हिंदू धर्मात लाल रंग हा पवित्र मानला जातो - नाना पटोलेUddhav Thackeray : मविआच्या मंचावर उद्धव ठाकरेंची एन्ट्री, नाना पटोलेंनी भाषण थांबवलं!Atal Setu Bridge Story : मुंबईकरांचं आयुष्य बदलणारा एक पूल! अटल सेतूच्या निर्मितीची संपूर्ण कहाणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
Embed widget