महिलांना बंदूक बाळगण्याची परवानगी द्या, माझ्याकडून बंदूक वाटप करेल; शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचं अजब वक्तव्य
महिलांना रिवाल्वर बाळगण्याची परवानगी द्यावी, त्यांनी परवानगी दिली तर मी अमरावतीमध्ये सर्व महिलांना माझ्या कडून रिवाल्वर घेऊन देईल, असे अजब दावा शिवसेना शिंदे गटाचे नानकराम नेभनानी यांनी केला आहे.
Maharashtra Politics अमरावती : बांगलादेश (Bangladesh Violence) येथे झालेल्या हिंदू मुलींवर अत्याचार करणाऱ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे कारवाई करणार आहेच. मात्र मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, महिलांना रिवाल्वर बाळगण्याची परवानगी द्यावी, त्यांनी परवानगी दिली तर मी अमरावतीमध्ये सर्व महिलांना माझ्या कडून रिवाल्वर घेऊन देईल, असे अजब दावा शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी नानकराम नेभनानी यांनी केला आहे.
बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचारच्या निषेधार्थ आणि पिडीत हिंदूंच्या समर्थनार्थ अमरावती शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट हिंदू मोर्चा आयोजीत करण्यात आला आहे. या विराट मोर्चात भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि विविध हिंदू संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह हजारो अमरावतीकर रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करत आहे. यात भाजपचे खासदार अनिल बोंडे, नवनीत राणा देखील सहभागी झाल्या होत्या.दरम्यान, हा मोर्चा नेहरू मैदानावरून सुरू झाला असून इर्विन चौकात जाहीर सभा झाल्यावर या मोर्चाचे समापन होणार होतं. यावेळी बोलताना नानकराम नेभनानी यांनी हे वक्तव्य केले आहे.
...तर अमरावतीमध्ये सर्व महिलांना माझ्या कडून रिवाल्वर
नानकराम नेभनानी हे शिवसेना शिंदे गटाचे मुख्य समन्वयक, शिवसेना प्रणित सिंधी समाज महाराष्ट्र संघटक असून जिल्हा नियोजन समितीचे ते विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त आहेत. दरम्यान राज्यात सध्या घडत असलेल्या महिलांवरील अत्याचारांच्या घटनावर भाष्य करताना महिलांना रिवाल्वर बाळगण्याची परवानगी द्यावी, अशी अजब मागणी नानकराम नेभनानी यांनी केली आहे.
तर पुढे बोलताना ते म्हणाले की, याबाबत परवानगी दिली तर मी स्वत: अमरावतीमध्ये सर्व महिलांना माझ्या कडून रिवाल्वर घेऊन देईल, असे भाकीतही नेभनानी यांनी केलं आहे. त्यामध्ये दोन-तीन लोकं मेले तरी चालेल, पण चुकीचा माणूस वाचू नये, त्याचं मी समर्थन करेल, त्यामध्ये लागणाऱ्या कोर्ट कचेरीचा संपूर्ण खर्चही मी करेल. सोबतच त्यांच्या परिवारावर काही आलं तर त्यासाठी मी समोर राहील. असेही वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे नानकराम नेभनांनी यांनी सकल हिंदू समाजाच्या मोर्च्या दरम्यान केलं आहे.
वाशिमच्या मंगरुळपीर शहर बंदची हाक
बांग्लादेशमध्ये हिंदूवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटने कडून वाशिमच्या मंगरुळपीर शहर बंदची हाक देण्यात आली. या वेळी विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत विशाल निषेध मोर्चाच आयोजन केले. बांगलादेशमध्ये सत्तापालट झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारा मध्ये हिंदू बांधवांचा क्रूरपणे छळ झाल्याने हिंदू दैवताचे मंदिर आणि जाळपोळ करून हिंदूंच्या संपत्तीवर जबरण कब्जा करणे, हिंदूंची मंदिरे तोडन्यात आल्याच्या अनेक घटना पुढे आल्याचे सांगत या घटनेचा निषेध करण्यासाठी आज मंगरुळपिर शहर बंद ठेवण्यात आले. या बंदला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलाय.
हे ही वाचा