Maharashtra School: मोठी बातमी: राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू होणार, नावाच्या आधी Tr. लागणार
Maharashtra Schools: महाराष्ट्रातील शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांनाही ड्रेसकोड लागू होणार आहे. त्यामुळे आता शिक्षकांनाही शाळेत ठरवून देण्यात आलेले कपडे घालून यावे लागेल. शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू झाल्यावर नेमकं काय होणार?

मुंबई: राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व शाळांच्यादृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता राज्यातील प्रत्येक शाळेत ड्रोस कोड लागू होणार आहे. त्यामुळे शाळेत आता शिक्षकांना टी-शर्ट किंवा जीन्स पँट परिधान करता येणार नाही. सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील पुरूष व महिला शिक्षकांना शाळा (Schools) निश्चित करेल अशा रंगाच्या ड्रेसकोडचे पालन करणे बंधनकारक असेल. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी याबाबतची घोषणा केली.
शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू झाल्यावर नेमकं काय होणार?
राज्यातील शाळांमध्ये ड्रेसकोड लागू झाल्यानंतर शिक्षकांना त्यांच्या मनाप्रमाणे कोणतेही कपडे घालता येणार नाहीत. शाळेतील सर्व शिक्षकांना व्यवस्थापनाने निश्चित केलेले कपडे परिधान करावे लागतील. महिला शिक्षकांना साडी अथवा सलवार-चुडीदार, कुर्ता,दुपट्टा असा पेहराव असावा. तर पुरूष शिक्षकांना शर्ट-ट्राउझर पँट घालावी लागेल. शर्ट इन असावा तसेच गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम किंवा चित्रे असलेले पेहराव घालू नयेत.तसेच शिक्षकांनी जीन्स टी-शर्टचा वापर शाळेमध्ये करू नये या मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत.
शिक्षकांचं स्टेटस वाढणार
एकीकडे राज्य सरकारने शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू केला असेल तरी दुसऱ्या बाजुला त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने घेतलेल्या आणखी एका निर्णयामुळे शिक्षकी पेशा आता स्टेटस सिम्बॉल होणार आहे. शिक्षकांना समाजात प्रतिष्ठेचे स्थान असल्याने शिक्षकांच्या नावाच्या आधी इंग्रजीत टीआर (Tr)आणि मराठीत टि असे संबोधन लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्याप्रमाणे डॉक्टर यांच्या नावाच्या आधी डॉ. व ॲडव्होकेट यांच्या नावाच्या आधी ॲड. संबोधन लावण्यात येते. त्याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षकांच्या वाहनावर देखील हे संबोधन व त्याअनुरूप बोधचिन्ह देखील लावण्याची परवानगी देण्यात आल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.
आणखी वाचा
प्राथमिक शाळा नऊ वाजेनंतर भरवण्याच्या निर्णयाला स्कूलबस मालकांचा विरोध
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती





















