एक्स्प्लोर

Baramati News : मुख्यमंत्री माझी शाळा योजनेमध्ये राज्यात बारामतीचा झेंडा! शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर शाळेचा राज्यात दुसरा क्रमांक

मुख्यमंत्री माझी शाळा हे अभियान नुकतेच राज्यात राबवण्यात आले. यामध्ये खाजगी शाळांमध्ये बारामतीच्या एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदानगर येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतन शाळेने राज्यामध्ये दुसरा क्रमांक पटकावला.

बारामती, पुणे :  मुख्यमंत्री माझी शाळा हे अभियान नुकतेच राज्यात राबवण्यात आले. यामध्ये खाजगी शाळांमध्ये बारामतीच्या एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदानगर येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतन शाळेने राज्यामध्ये दुसरा क्रमांक पटकावला. या शाळेने तब्बल 21 लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे. या अभियानामध्ये राज्यातील एक लाख तीन हजार हून अधिक शाळांनी भाग घेतला होता.

राज्यातील एक कोटी 99 लाख विद्यार्थ्यांनी या योजनेत सहभाग घेतला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे अभियान राज्यभर राबवण्यात आले होते. त्याचे मूल्यांकन समितीने 29 फेब्रुवारी 2024 रोजी मूल्यांकन केले आणि आठ विभागातील प्रत्येकी एक याप्रमाणे शाळा निवडण्यात आल्या. यामध्ये सरकारी आणि खाजगी शाळांचे मूल्यांकन करण्यात आले. खाजगी शाळांमध्ये राज्यात शारदाबाई पवार विद्यानिकेतन शाळेने दुसरा क्रमांक मिळवला. येत्या 5 मार्चला मुंबई येथे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होणार आहे.

या अभियानामध्ये शाळेने केलेली वीजबचत आर्थिक साक्षरता डिजिटल उपकरणांचा वापर लोकशाही संसदीय मूल्यांचा वापर वैज्ञानिक दृष्टिकोन या बाबींचे मूल्यांकन करण्यात आले. त्याचबरोबर प्रधानमंत्री पोषण अभियान अंतर्गत परसबाग अन्नाची योग्य रीतीने विल्हेवाट व व्यवस्थापन तसेच शाळेतील मूल्य संस्कार वृक्ष संवर्धन वडीलधाऱ्यांचा सन्मान अशा अनेक बाबींचा यामध्ये समावेश करण्यात आला होता.

या सर्व बाबींमध्ये हजारो शाळांच्या मूल्यांकनात शारदानगरच्या शाळेने बाजी मारली. एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सौ. सुनंदाताई पवार यांच्यासह सर्व विश्वस्त, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, संस्थेचे समनव्ययक प्रशांत तनपुरे यांनी शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत मुंडे व त्यांचे सर्व सहकारी यांचे मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले. तर वरील सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या अमूल्य मार्गदर्शनामुळेच शाळेने हा नावलौकिक 
मिळवल्याची कृतज्ञता मुख्याध्यापक सूर्यकांत मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली. 

शारदाबाई पवार विद्यानिकेतनचे वैशिष्ट्य काय?

फक्त शैक्षणिक घोकमपट्टी या प्रकाराच्या पलीकडे जाऊन शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर या शाळेने आंतरराष्ट्रीय स्तरावर फिनलँड व नेदरलँड, इजराइल, कोस्टारीका, बाली (इंडोनेशिया) या देशातील शैक्षणिक संस्थांशी शिक्षक प्रशिक्षणासाठी शैक्षणिक सामंजस्य करार केला. ही शाळा भारतातील ग्राममंगल, नेहरू विज्ञान केंद्र , होमीभाभा विज्ञान केंद्र, अगस्त्या  इंटरनॅशनल फौंडेशन, कुप्पम या संस्था मार्फत शिक्षक प्रशिक्षण आयोजन करते. मेंदु आधारित शिक्षण पध्दती, अद्यावत तंत्रज्ञानाचा अवलंब, त्याकरता मेकर्स स्पेस लॅब मीडिया लॅब इनोवेशन लॅब अटल लॅब फन सायन्स गॅलरी अशा अनेक नवतंत्रज्ञानाचा वापर येथील विद्यार्थी करतात. शिक्षक विद्यार्थ्यांना गुगल द्वारे मोफत अनलिमिटेड स्टोअरेज स्पेस उपलब्ध करून देण्यात आले असून एका विद्यार्थ्याने नासा मधील खडतर प्रशिक्षणही पूर्ण केले आहे.

शाळेचे सामाजिक उपक्रम

या शाळेत सन 2002 पासून जीवन समृद्धी प्रकल्प राबविला आहे. जर्मन, स्पॅनिश या व्यावसायिक भाषांचा देखील अभ्यास येथील विद्यार्थी करतात. एवढेच नाही तर सामाजिक उपक्रम अंतर्गत या शाळेने बारामती व पुरंदर तालुक्यातील 125 अनुदानित माध्यमिक शाळांना सायन्स किट चे वाटप टाटा ट्रस्ट फंडातून केले आहे. शाळेच्या पुढाकाराने चला समृद्ध गाव घडवू या या योजनेअंतर्गत पाणी फाऊंडेशन व टाटा ट्रस्ट च्या आर्थिक सहायाने जलसंधारणाचे यशस्वी भरीव काम केले असून कोल्हापूर, सांगली, चिपळूण व केरळ पूरग्रस्तांसाठी शाळेच्या विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यामार्फत मदत केली.  शाळेच्या पुढाकाराने गरीब व होतकरू मुलींसाठी टाटा ट्रस्टच्या फंडातून 19000 सायकलींचे वाटप करण्यात आले.

इतर महत्वाची बातमी-

-Pune Weather Update : पुणेकरांना उन्हापासून दिलासा; पुण्यात 13 अंश सेल्सिअस तापमान; गारठा वाढण्याची शक्यता

-Pune News : 24 तास उलटले तरी बिबट्या सापडेना; कात्रजमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, प्राणीसंग्रहालय आजही बंद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीचा जागावाटपाचा अंतिम निर्णय आज होणार? फडणवीसांसह अजित पवार दिल्लीत दाखल, अमित शाहंसोबत होणार बैठक
महायुतीचा जागावाटपाचा अंतिम निर्णय आज होणार? फडणवीसांसह अजित पवार दिल्लीत दाखल, अमित शाहंसोबत होणार बैठक
साखर पट्ट्यातील माढ्यात विधानसभेला महाविकास आघाडी की महायुती; पवारांच्या बालेकिल्ल्यात कोण जिंकणार
साखर पट्ट्यातील माढ्यात विधानसभेला महाविकास आघाडी की महायुती; पवारांच्या बालेकिल्ल्यात कोण जिंकणार
मुंबईतील मध्य रेल्वेलाईनवर लोकल रुळावरुन घसरली; वाहतूक खोळंबली
मुंबईतील मध्य रेल्वेलाईनवर लोकल रुळावरुन घसरली; वाहतूक खोळंबली
Salim Khan Exclusive: बाबा सिद्दीकी हत्या ते लॉरेन्स बिश्नोई; सलमानचे वडील सलीम खान यांची स्फोटक मुलाखत
Video : बाबा सिद्दीकी हत्या ते लॉरेन्स बिश्नोई; सलमानचे वडील सलीम खान यांची स्फोटक मुलाखत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Thackeray Group Special Report : राजन तेलींची 19 वर्षांनी घरवापसी:भाजपला रामरामRajkiya Shole : जागांवरून खटका कुणाला झटका ? 18 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaVidhansabha Superfast News : विधानसभा निवडणुकांच्या प्रत्येक बातम्या एका क्लिकवर : 18 October 2024Zero Hour : अमित ठाकरेंसाठी ठाकरे बंधू मुलांसाठी ॲडजस्टमेंट करणार ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुतीचा जागावाटपाचा अंतिम निर्णय आज होणार? फडणवीसांसह अजित पवार दिल्लीत दाखल, अमित शाहंसोबत होणार बैठक
महायुतीचा जागावाटपाचा अंतिम निर्णय आज होणार? फडणवीसांसह अजित पवार दिल्लीत दाखल, अमित शाहंसोबत होणार बैठक
साखर पट्ट्यातील माढ्यात विधानसभेला महाविकास आघाडी की महायुती; पवारांच्या बालेकिल्ल्यात कोण जिंकणार
साखर पट्ट्यातील माढ्यात विधानसभेला महाविकास आघाडी की महायुती; पवारांच्या बालेकिल्ल्यात कोण जिंकणार
मुंबईतील मध्य रेल्वेलाईनवर लोकल रुळावरुन घसरली; वाहतूक खोळंबली
मुंबईतील मध्य रेल्वेलाईनवर लोकल रुळावरुन घसरली; वाहतूक खोळंबली
Salim Khan Exclusive: बाबा सिद्दीकी हत्या ते लॉरेन्स बिश्नोई; सलमानचे वडील सलीम खान यांची स्फोटक मुलाखत
Video : बाबा सिद्दीकी हत्या ते लॉरेन्स बिश्नोई; सलमानचे वडील सलीम खान यांची स्फोटक मुलाखत
मोठी बातमी! संभाजीनगरच्या 5 मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
मोठी बातमी! संभाजीनगरच्या 5 मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
Shahrukh Khan: अभिनयानंतर शाहरुखला आवडणारी दुसरी गोष्ट कोणती?; किंग खानने स्वत:च सांगितलं
अभिनयानंतर शाहरुखला आवडणारी दुसरी गोष्ट कोणती?; किंग खानने स्वत:च सांगितलं
NCP Candidate list : बारामतीतून अजित पवारच, नवाब मलिकांनाही संधी; राष्ट्रवादीच्या संभाव्य 41 उमेदवारांची यादी समोर
बारामतीतून अजित पवारच, नवाब मलिकांनाही संधी; राष्ट्रवादीच्या संभाव्य 41 उमेदवारांची यादी समोर
बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसोझासह अनेकांवर गुन्हा दाखल; हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद
बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसोझासह अनेकांवर गुन्हा दाखल; हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद
Embed widget