एक्स्प्लोर

Maharashtra School : प्राथमिक शाळा नऊ वाजेनंतर भरवण्याच्या निर्णयाला स्कूलबस मालकांचा विरोध

School Bus Owners Oppose Time Change Decision : शिक्षण विभागाने चर्चा न करता मार्ग काढल्याने निर्णयाची अंमलबजावणी करताना अडचण होत असल्याचं स्कूलबस मालकांचं म्हणणं आहे. या निर्णयाला स्कूलबस मालकांनी विरोध दर्शवला आहे.

Maharashtra School Time Change : पूर्व प्राथमिक (Pre-Primary School) आणि प्राथमिक शाळा (Primary School) सकाळी नऊच्या नंतर भरवण्याच्या निर्णयाला स्कूलबस मालकांनी विरोध दर्शवला आहे. शिक्षण विभागाने चर्चा न करता मार्ग काढल्याने निर्णयाची अंमलबजावणी करताना अडचण होत असल्याचं स्कूलबस मालकांचं (School Bus Owners) म्हणणं आहे. सरकारने निर्णयावर फेरविचार न केल्यास आणि स्कूल बस मालकांना सक्ती केल्यास भ़ाडे वाढ करण्याचा इशारा स्कूलबस मालकांनी दिला आहे. स्कूलबसचे भाडे 25 ते 40 टक्क्यांनी वाढवणार, असा इशारा स्कूल बस मालकांनी राज्य सरकारला दिला आहे. 

सरकारच्या निर्णयाला स्कूल बस मालक संघटनांचा विरोध

पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंत शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरवण्याच्या शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मात्र, या निर्णयाला स्कूल बस मालक संघटनांनी विरोध दर्शवला आहे. शाळा व्यवस्थापन आणि स्कूल बस मालकांशी कुठल्याही प्रकारे चर्चा न करता हा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून  घेण्यात आल्याचा  स्कूल बस मालकांचे म्हणणं आहे. सकाळी नऊ वाजता जर शाळा भरत असेल  तर, मुंबईत गर्दीच्या वेळी म्हणजेच पीक आवरमध्ये  स्कूल बसला फेऱ्या माराव्या लागणार आहेत, ही मोठी अडचण असल्याचं स्कूलबस मालकांचं म्हणणं आहे.

स्कूल बस मालक संघटनांचं म्हणणं काय?

मुंबईतील वाहतूक कोंडी आणि रस्त्याची स्थिती याची जाणीव राज्य सरकारला आहे. शिवाय प्राथमिक शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरवल्यास दोन शिफ्टचे व्यवस्थापन  स्कूलबस मालकांना शक्य होणार नाहीत. यामुळे स्कूलबस एकूण आठ फेऱ्या गर्दीच्या वेळी माराव्या  लागणार आहेत. यामध्ये  कार्यालयीन कर्मचाऱ्याची जाण्याची आणि येण्याची वेळ असल्याने या गर्दीत विद्यार्थ्यांना ने-आण  करणे, हे अधिक अडचणीचे होणार असून  यामध्ये अधिकचा वेळ लागणार आहे. 

स्कूलबस भाडे 25 ते 40 टक्के वाढविण्याचा इशारा

सरकरने जर निर्णय बदलला नाही आणि बस मालकांना ही वेळ जर सक्तीची केली, तर स्कूल बस मालक संघटना स्कूलबस भाडे 25 ते 40 टक्के वाढविण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे किंवा काही शाळांसाठी प्राथमिक शाळेसाठी स्कूल बस सेवा देणे कठीण असल्याचं संघटनांकडून सांगण्यात आलं आहे.

राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजेनंतर

राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा (Maharashtra School) या सकाळी 9 वाजता किंवा त्यानंतर भरवण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे.  त्यामुळे आता सर्व शाळांना शासन निर्णयानुसार आपल्या शाळा भरवण्याचा नियोजन करावे लागणार आहे. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
KL Rahul: शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange on Santosh deshmukh : संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण, जरांगे काय म्हणाले?
MVA News : काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे मविआत नाराजीनाट्य, उद्धव ठाकरे, शरद पवारांची नाराजी
Nana patole and Chandrashekhar Bawankule : नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलीच जुंपली
Nitesh Rane PC : Nilesh Rane यांचा बळीचा बकरा केला जातोय; नितेश राणेंनी केली भावाची पाठराखण
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
KL Rahul: शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
IND vs SA : आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेत रोहित- यशस्वी सलामीला येणार? कॅप्टन केएल राहुल 'या' स्थानावर फलंदाजीला येणार, संभाव्य प्लेईंग XI
केएल राहुलचं ठरलं, पहिल्या वनडेत या स्थानावर फलंदाजी करणार, रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार? 
तेलंगणाहून निघालेले दाम्पत्य बेपत्ता, विहिरीत आढळली कार; ग्रामस्थांची गर्दी, पोलिस घटनास्थळी
तेलंगणाहून निघालेले दाम्पत्य बेपत्ता, विहिरीत आढळली कार; ग्रामस्थांची गर्दी, पोलिस घटनास्थळी
Embed widget