धक्कादायक! साक्षीदारांना धमकावणारं रॅकेट उघड; एटीएसच्या कारवाईत हेड कॉन्स्टेबलही ताब्यात
एटीएसची मोठी कारवाई. विशेष प्रकरणांच्या साक्षीदारांना धमकवणाऱ्यांच्या रॅकेटचं पितळ उघड. मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातून दिल्या जात होत्या धमकीच्या चिठ्ठा. पुढं गॅंगस्टरची माणसं....
![धक्कादायक! साक्षीदारांना धमकावणारं रॅकेट उघड; एटीएसच्या कारवाईत हेड कॉन्स्टेबलही ताब्यात maharashtra ats took action agaist gang who threaten the witness in mumbai ann धक्कादायक! साक्षीदारांना धमकावणारं रॅकेट उघड; एटीएसच्या कारवाईत हेड कॉन्स्टेबलही ताब्यात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/27131815/mahaats.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : महाराष्ट्र एटीएसचे (ATS) डीआयजी शिवदीप लांडे यांनी आणि त्यांच्या टीमनं एका मोठ्या रॅकेटचं पितळ उघडं केलं आहे. ज्या अंतर्गत चक्क अनेक प्रकरणांच्या साक्षीदारांना धमकावण्याचं सत्र सुरु होतं. या कारवाईत पोलिसांनी आजीवन कारावासाची शिक्षा भोगणाऱ्या एका गँगस्टरसह सदर कारागृहातील हेड कॉन्स्टेबल अर्जुन घोडके यांनाही अटक केली आहे. हा गँगस्टर कारागृहातूनच धमकीच्या चिठ्ठ्या त्याच्या माणसांद्वारे बाहेर पाठवत होता. या चिठ्ठ्यांच्या माध्यमातून तो काही विशेष प्रकरणांच्या साक्षीदारांना धमकावत होता. मुख्य म्हणजे या साऱ्यामध्ये अर्थात चिठ्ठ्या बाहेर पोहोचवण्यामध्ये खुद्द कारागृहातील हेड कॉन्स्टेबलला त्यानं हाताशी घेतलं होतं.
एटीएसनं केलेल्या कारवाईमध्ये गँगस्टर हरीश मांडवीकरला अटक करण्यात आली. मांडवीकर आधीपासूनच मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात एका हत्येप्रकरणी आजीवन कारावासाची शिक्षा भोगत आहे. आता कारागृहातूनच रॅकेट चालवत गुन्हेगारी कृत्यांसाठी आपल्या गँगचं नेतृत्त्व करण्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.
एटीएसच्या माहितीनुसार जून 2015 मध्ये त्यांच्याकडून मॅन्युफॅक्चर आणि डिस्ट्रिब्यूशन रॅकेट उघडकीस आणलं होतं. यामध्ये 155 किलो कच्चं आणि तयार स्वरुपातील कोट्यवधींच्या किंमतीचं मेफेड्रिन जप्त करण्यात आलं होतं. या प्रकरणी सातजणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. यात साजिद इलेक्ट्रीकवाला नावाच्या एकाचाही समानेश होता.
इलेक्ट्रीकवाला हा आर्थर रोड कारागृहातील मांडवीकरच्या संपर्कात होता. मार्च 2020 मध्ये इलेक्ट्रीकवालाविरोधातील साक्ष न्यायालयात त्याचा जबाब देणार होता. पण, लॉकडाऊनमुळं असं होऊ शकलं नाही. पुढं साक्ष देण्यासाठी नोव्हेंबर 2020 मधील तारीख देण्यात आली. तेव्हाच सदर साक्षीदाराला मांडवीकरच्या माणसांनी धमक्या देण्यास सुरुवात केली.
कसं उघडकीस आलं हे प्रकरण?
आपल्याला मिळत असलेल्या धमक्यांची तक्रार या साक्षीदारानं एटीएसच्या कांदिवलीतील चारकोप युनिटला दिली. सुजित पडवळकर आणि सचिन कोळेकर या दोघांनी आपल्याला धमकावल्याचं आणि खोटी साक्ष देण्यास दबाव टाकल्याचं स्पष्ट केलं. ज्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलं. तेव्हाच आपण मांडवीकरच्या सांगण्यावरुन काम करत असल्याची माहिती त्यांनी उघड केली.
मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह दोन मॉडेल्सचा सहभाग, एका महिलेस अटक
पुढं मांडवीकरनं थेट हेड कॉन्स्टेबलला हाताशी घेत कारागृहाबाहेर चिठ्ठ्या पाठवल्याची धक्कादायक माहिती समोर आली. कोणत्याही साक्षीदाराला धमकवायचं झाल्यास त्याबाबतची माहिती आणि नेमकी ही धमकी कशी द्यावी याची माहिती मांडवीकर चिठ्ठीत लिहायचा. ही चि्ठ्ठी सदर पोलिसांच्या माध्यमातून तो कोळेकरपर्यंतच पोहोचवायचा आणि कोळेकर पुढं काय करायचं, याची माहिती पडवळकरला द्यायचा. पडवळकरच साक्षीदारांना धमकी देण्यासाठी जायचा असंही या तपासातून समोर आलं.
अतिशय धक्कादायक प्रकारे समोर आलेल्या या प्रकरणातील मांडवीकर याच्या नावे 13 गुन्ह्यांची नोंद आहे. ज्यामध्ये मटका किंग सुरेश भगतची हत्या करण्याचा आरोपही त्याच्यावर आहे. याच आरोपात दोषी आढळल्यामुळं त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. असं म्हटलं जातं की उत्तर- पश्चिम उपनगरांमध्ये मांडवीकरचे गट अजूनही सक्रिय आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)