(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lumpy Skin Disease : लम्पी स्कीनच्या पार्श्वभूमीवर मुंबई प्रशासन सतर्क, जनावरांची ने आण करण्यास पुर्णतः बंदी
लम्पी स्कीनच्या पार्श्वभूमीवर मुंबई प्रशासन (Mumbai Administration) देखील सतर्क झालं आहे. मुंबईत प्राणी प्रदर्शन, बाजार, जनावरांची ने आण करण्यास पुर्णतः बंदी घालण्यात आली आहे.
Lumpy Skin Disease : राज्यात लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy Skin Disease) धोका वाढला आहे. राज्यातील जवळपास 22 जिल्ह्यांमध्ये जनावरांना लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं पशुपालक चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं आहे. अनेक जिल्ह्यात जनावरांचे बाराज भरवणं बंद करण्यात आले आहेत. आता या लम्पी स्कीनच्या पार्श्वभूमीवर मुंबई प्रशासन (Mumbai Administration) देखील सतर्क झालं आहे. मुंबईत प्राणी प्रदर्शन, बाजार, जनावरांची ने आण करण्यास पुर्णतः बंदी घालण्यात आली आहे.
13 ऑक्टोबर 2022 पर्यंत आदेश लागू, उल्लंघन केल्यास होणार कारवाई
लम्पी स्कीनमुळं राज्यातील पशुपालक चिंतेत आहेत. दिवसेंदिवस लम्पी स्कीन आजारात वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. प्राण्यांच्या बाजारावर, प्रदर्शन भरवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्तांनी देखील प्राणी प्रदर्शन, बाजार, जनावरांची ने आण करण्यास पुर्णतः बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. हे आदेश 14 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर 2022 पर्यंत लागू करण्यात आले आहेत.
लम्पी बाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासन करणार
देशातील विविध राज्यात लम्पी स्कीन या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं देशातील पशुपालक सध्या चिंतेत आहे. महाराष्ट्रातही जवळपास 22 जिल्ह्यात लम्पी स्कीन या आजाराचा जनावरांवर प्रादुर्भाव झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं आहे. राज्यात लंपी रोगावर नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. लम्पी बाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येईल, तसेच जिल्हास्तरावर उपचारासाठी आवश्यक औषधांची 'ड्रग्ज बँक' देण्यात येणार असल्याचे मत राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil) यांनी केलं. तसेच एका दिवसात एक लाख पशुधनाचे लसीकरण करण्यात येत असल्याचे विखे पाटील म्हणाले.
पशुसंवर्धन आयुक्तालयात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत विखे पाटील बोलत होते. या बैठकीला पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन डॉ. डी. डी परकाळे उपस्थित होते. राज्यासाठी एका आठवड्यात 50 लाख लसमात्रा उपलब्ध होणार आहेत. लसीकरणासाठी खासगी पशुवैद्यक आणि पशुवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात यावी असे देखील विखे पाटील यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: