एक्स्प्लोर

'जनावरांमध्येही आता दो गज दूरी', लम्पीला रोखण्यासाठी क्वारंटाईन सेंटर उभारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

Lumpy Skin Disease : राज्यात वेगाने पसरत असलेल्या जनावरांच्या लम्पी स्कीन (Lumpy Skin Disease) संदर्भात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

Lumpy Skin Disease : राज्यात वेगाने पसरत असलेल्या जनावरांच्या लम्पी स्कीन (Lumpy Skin Disease) संदर्भात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. जनावरांमध्ये रोगाची वाढती संख्या पाहाता आणि पुढील धोका ओळखून शासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लम्पी स्कीन रोगाबाबत मोठी घोषणा केली आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लम्पी स्कीन रोगाला रोखण्यासाठी जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर उभारण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासोबत, लम्पी स्कीन आजारांमुळे मृत पावलेल्या जनावरांचा मोबदला त्या शेतकऱ्यांना देणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 

औरंगाबादमधील विनोद पाटील यांनी लम्पी स्कीन आजाराचा धोका ओळखून क्वारंटाईन सेंटर उभारण्याची मागणी केली होती. याचा विचार करुन मुख्यमंत्र्यांनी आज क्वारंटाईन सेंटर उभारण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, लम्पी रोग राज्यातील जवळपास 22 जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. ज्या ठिकाणी लम्पी रोगाची लागण झालेली आहे त्या ठिकाणाहून पाच किमीच्या परिघात सर्व जनावरांचं लसीकरण केलं जाणार आहे. 

टास्क फोर्सची स्थापना - 
राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यीय टास्क फोर्सची स्थापन करण्यात आील आहे.  लम्पी रोग अटोक्यात आणण्यासाठी नियमित आढावा घेऊन त्यावर उपाययोजना आणि शिफारस हे टास्क फोर्स करणार आहे. 

लम्पी स्कीन बाधित पशुधनाच्या औषधांचा सर्व खर्च शासन करणार - राधाकृष्ण विखे पाटील
लम्पी बाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येईल, तसेच जिल्हास्तरावर उपचारासाठी आवश्यक औषधांची 'ड्रग्ज बँक' देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. 
राज्यासाठी एका आठवड्यात 50 लाख लसमात्रा उपलब्ध होणार आहेत. लसीकरणासाठी खाजगी पशुवैद्यक आणि पशुवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात यावी. खाजगी पशुवैद्यकांना आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. विद्यार्थ्यांना निवास व अनुशंगिक व्यवस्था आणि प्रति लसीकरण तीन रूपये प्रमाणे मानधन सुरू करावे. जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाव पातळीवर भेटी देवून लंपी चर्म आजाराबाबत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा, असेही विखे पाटील यांनी सांगितलेय. 

जनावरांच्या दुधाचं प्रमाण घटतंय -
लम्पी आजारामुळं जनावरांचं दुधाचं प्रमाण घटत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सुरुवातीला बियाणांच्या वाढत्या किंमती, बोगस बियाणं, अतिवृष्टी यामुळं शेती पिकाचं अतोनात नुकसान झालं होतं. तर आता शेतकऱ्यांचा जोडधंदा असणाऱ्या दुग्ध व्यवसावरही गंडांतर आलं आहे. कारण जनावरावरील लम्पी आजारामुळं शेतकऱ्यांना दुभती जनावरे विकण्याची वेळ आली आहे. तर ही जनावरे खरेदीदारही खरेदी करण्यास तयार नाहीत. तर आजारी जनावरांचे दूधही आता बाजारात विकत घेतलं जात नाही.

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट
किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट
Dharashiv: तुटपुंज्या अग्रीम मदतीवरून तीव्र नाराजी; शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना केली 5 हजारांची मनी ऑर्डर; तर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, हा मदतीचा पहिला टप्पा...
तुटपुंज्या अग्रीम मदतीवरून तीव्र नाराजी; धाराशिवाच्या शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना केली 5 हजारांची मनी ऑर्डर; तर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, हा मदतीचा पहिला टप्पा...
साखर पट्ट्यात खळबळ, कारखानदारांनी घेतला राजू शेट्टींचा धसका, साखरेचा हमीभाव वाढवा, नाहीतर कारखाने बंद ठेवा, सरकारला थेट इशारा
साखर पट्ट्यात खळबळ, कारखानदारांनी घेतला राजू शेट्टींचा धसका, साखरेचा हमीभाव वाढवा, नाहीतर कारखाने बंद ठेवा, सरकारला थेट इशारा

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Embed widget